तिवरे धरणफुटीच्या सात दिवसानंतर 4 जणं अजुनही बेपत्ता

तिवरे धरणफुटीच्या सात दिवसानंतर 4 जणं अजुनही बेपत्ता

पाण्याचा असलेला प्रचंड प्रवाह, चिखल आणि कठीण वाटेमुळे शोध मोहिमेस अडचण

  • Share this:

स्वप्नील घाग, गुहाघर 8 जुलै : तिवरे धरण फुटण्याच्या  दुर्घटनेला आज 7 दिवस पूर्ण झालेत. मात्र अजुनही 4 जणांचे मृतदेह मिळाले नसल्याचं NDRF पथकाच्या बचाव पथकाचे प्रमुख राजेश येवले यांनी सांगितलंय. आत्तापर्यंत 19 मृतदेह शोधण्यास NDRFच्या जवानांना  यश आलंय. पाण्याचा असलेला प्रचंड प्रवाह, चिखल आणि कठीण वाटेमुळे अडचण येत असल्याचं त्यांनी सांगितलं. आणखी काही दिवस हा शोध सुरूच राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

तिवरे धरण दुर्घटनेला आठवडा पूर्ण होत आलाय तरीही या धरणाच्या लगत असलेल्या फणस वाडीची दळणवळणाची समस्या कायम आहे. या वाडीत जाणारा पूल आजही मातीखालीच आहे, त्यामुळे जाण्या-येण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे या वाडीतील जवळपास 50 घरांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. तर मुलांच्या शाळेची समस्या निर्माण झालीय.

काँग्रेस नेतृत्वाच्या शोधात; तर भाजपकडून 2024 तयारी सुरू!

नेमकं काय झालं होतं?

तिवरे धरण मंगळवारी रात्री 8 ते 9 च्या सुमारास फुटले. धरणाच्या पायथ्याशी असलेली भेंडेवाडी वाहून गेली. बचाव पथकाला आतापर्यंत 19 मृतदेह शोधण्यात यश आले असून अद्याप 04 जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस, जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान मध्यरात्री घटनास्थळी दाखल झाले होते. नदीच्या काठावरील 5 घरांचे मोठे नुकसान झालं होतं. चिपळूनसह परिसरातील जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे तडे गेलेल्या धरणाच्या भिंतींना तडे गेले आणि धरण फुटलं. धरण फुटल्यामुळे भेंडेवाडी (तिवरे गाव) या गावावर आस्मानी संकट कोसळलं.

WORLD CUP : ...तर सेमीफायनल न खेळताच भारत थेट फायनलमध्ये धडक

मृतांच्या नातेवाईकांना चार महिन्यांत पक्की घरे

रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागात हे गाव आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे मध्यरात्री 2 वाजता घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचावकार्य सुरु केले. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची या घटनेची दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मृतांच्या नातेवाईकांना चार महिन्यांत पक्की घरे बांधून देणार असल्याची घोषणा देखील महाजन यांनी या वेळी केली. तोपर्यंत त्यांच्या राहण्याची व्यवस्था शासन करणार असल्याचे महाजन यांनी माहिती दिली. तत्पूर्वी, गिरीश महाजन आणि रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी चिपळूण येथील कामथे रुग्णालयात जाऊन मृतदेहांची पाहणी केली. त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 8, 2019 03:52 PM IST

ताज्या बातम्या