अखेर 'या' तारखेला येणार महाराष्ट्रात मान्सून

25 जूनपर्यंत मान्सून सर्व महाराष्ट्रात सक्रिय होईल असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केलाय.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 09:48 PM IST

अखेर 'या' तारखेला येणार महाराष्ट्रात मान्सून

पुणे, 17 जून : सध्या सगळ्या महाराष्ट्राला वेध लागले ते मान्सूनचे. उन्हाने होरपळणाऱ्या राज्याला पाऊस एकदाचा केव्हा येतो आणि केव्हा नाही असं झालंय. तर शेतकरी पावसाची उत्कंठेने वाट पाहातोय. वायू या चक्रिवादळाने मान्सूनचं आगमन लांबलंय. लांबलेला हा मान्सून 20 ते 21 जून या तारखेला महाराष्ट्रात येईल आणि 25 जून पर्यंत मान्सून सर्व महाराष्ट्रात सक्रिय होईल असा अंदाज पुणे वेधशाळेचे हवामान संचालक डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलीय.

वायू चक्रीवादळामुळे देशाच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. भारतीय हवमान विभागाच्या म्हणण्यानुसार, 20 जून नंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 20 तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यापासून मुंबईसह काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तर मुंबईतही पावसाचा जोर कमी आहे. मध्य भारतातही पावसाचा जोर कमी प्रमाणात आहे. पण 20 जूननंतर मात्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मूसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मान्सून केरळमध्ये

आठवड्याभरापूर्वी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्याची राज्याला आता प्रतिक्षा लागून राहिली आहे. 13 ते 14 जूनला मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. पण, वायू चक्रीवादळामुळे मात्र मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम झाला असून मुंबईकरांना आणखी आठवडाभर वाट पाहवी लागणार आहे. राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. शिवाय, उकाड्यानं देखील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा या पावसाकडे लागून राहिल्या आहेत.

Loading...

राज्यातल्या काही भागात पावसाची हजेरी

संपूर्ण राज्यात मान्सून अद्याप तरी सक्रिय झालेला नाही. पण, मुंबई, ठाणे, कोकण, नाशिक या भागात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 09:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...