S M L

मीच पळवला राजदंड, श्रेय घेण्यावरूनही चढाओढ

सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाच्याच आमदाराने राजदंड पळवण्याची दुर्मिळ घटना बुधवारी विधानसभेत घडली आणि हा राजदंड कुणी पळवला याचं श्रेय घेण्यासाठी चढाओढही लागली.

Updated On: Jul 11, 2018 05:52 PM IST

मीच पळवला राजदंड, श्रेय घेण्यावरूनही चढाओढ

नागपूर, ता.11 जुलै : सभागृहात एखाद्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी विरोधी पक्ष अनेक संसदीय हत्यारांचा वापर करत असतात. विरोधीपक्षांनी राजदंड पळवण्याचे प्रकारही सभागृहात अनेकदा घडले आहेत. पण सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाच्याच आमदाराने राजदंड पळवण्याची दुर्मिळ घटना बुधवारी विधानसभेत घडली आणि हा राजदंड कुणी पळवला याचं श्रेय घेण्यासाठी चढाओढही लागली. नाणार प्रकल्पावरून लक्षवेधी सुरू असताना नाणारवरून शिवसेना आक्रमक झाली. हा प्रकल्प कोकणात नकोच, नाणार रद्द करा अशी मागणी शिवसेनेनं केली. यावरू प्रचंड गोंधळ झाला, शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक थेट अध्यक्षांच्या आसनाजवळ गेले आणि त्यांनी राजदंड पळवून हौद्यात आणला. या मुद्यावरून श्रेय शिवसेना घेईल हे लक्षात येताच काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही या गोंधळात एंट्री केली आणि राजदंड पळवण्याला हातभार लावला.

आमदार नितेश राणे, प्रताप सरनाईकांनी राजदंड पळवला, 'नाणार'वरून विधानसभेत गोंधळ

अखेर ‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ मधील क्लॅश टळला

त्यानंतर सुरू झालं श्रेयाचं राजकारण. शिवसेना स्टंटबाजी करत आहे. मी राजदंड पळवल्यानंतर शिवसेनेला जाग आली असा दावा नितेश राणे यांनी केला तर शिवसेनेच्याच आमदारांनी राजदंड पळवला नंतर कोण आलं ते माहित नाही असा दावा शिवसेनेने केला.

समलैंगिकता गुन्हा की अधिकार याचा निर्णय सुप्रीम कोर्टानच घ्यावा - केंद्राची भूमिका

Loading...
Loading...

राजदंड पळवणं हे संसदीय परंपरेतली अनिष्ट प्रथा आहे. पण दिवसेंदिवस कामकाजाचा स्तर घसरत चालल्याने आता राजदंड कुणी पळवला याचं श्रेय घेण्यावरूनही चढाओढ होत असेल तर ते योग्य नाही अशी प्रतिक्रीया अनेक जाणत्या आमदारांनी व्यक्त केली.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2018 05:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close