विधानसभा निवडणुकीचा धडाका! राज्य सरकारची नवी योजना, 10 लाख नोकऱ्या होणार उपलब्ध

Employment, Chief Minister - राज्यात लवकरच रोजगारासाठी नवी योजना राबवली जाणार आहे

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2019 02:44 PM IST

विधानसभा निवडणुकीचा धडाका! राज्य सरकारची नवी योजना, 10 लाख नोकऱ्या होणार उपलब्ध

मुंबई, 30 जुलै : तुम्ही नोकरी शोधताय? आणि ती मिळत नसेल तर राज्य सरकार लवकरच रोजगार निर्मिती करतंय.राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकार लवकरच रोजगाराची योजना सुरू करतेय. चिफ मिनिस्टर एम्पलाॅयमेंट जनरेशन प्रोग्राम ( CMEGP ), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत पुढच्या 5 वर्षात 10 लाख नोकऱ्या निर्माण केल्या जातील. या योजनेअंतर्गत 10 हजार अति छोट्या, लहान आणि मध्यम आकाराच्या इंडस्ट्रियल युनिटला प्रत्येकी 15 लाख रुपये दिले जातील. त्याबदल्यात दर वर्षी या उद्योगांकडून 2 लाख नोकऱ्या दिल्या जातील.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेवरूनच या योजनेनं प्रेरणा घेतलीय. या योजनेत महाराष्ट्रातून 16 हजारांनी अर्ज केलेत. खरं तर लक्ष्य होतं 5 हजाराचं. याचा अर्थ बेरोजगारांची संख्या जास्त आहे. उद्योगखात्यानं मिळवलेल्या माहितीनुसार जवळजवळ 40 लाख बेरोजगार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत बऱ्याच जणांना नोकरीची संधी आहे.

आता काही मिनिटातच तुमचे आवडते पदार्थ घरपोच, 'ही' कंपनी करणार फूड डिलिव्हरी

सरकारला पुढच्या 5 वर्षात 1 लाख युनिट्स सुरू करायचे आहेत. पहिल्या वर्षात 10 हजार युनिट्स सुरू करण्याचं लक्ष्य आहे तर दुसऱ्या वर्षी 20 हजार युनिट्स सुरू करायची आहेत.

पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'या' आहेत आजच्या किमती

Loading...

सूत्रांच्या माहितीनुसार यासाठीची भांडवली गुंतवणूक 50 लाख रुपये आहे. राज्य यासाठी 35 टक्के मदत करेल आणि उद्योगपतींकडून 10 टक्के मदत घेतली जाईल. उरलेलं भांडवल बँकेकडून कर्जानं घेतलं जाईल.

जगातल्या टाॅप CEO मध्ये मुकेश अंबानी, 'या' 10 भारतीयांचाही समावेश

ही योजना यशस्वी करण्यासाठी अनेक खासगी बँकांशी करार केलाय. पुढच्या 5 वर्षात या बँकांकडून 2हजार कोटींची अपेक्षा आहे. राज्य सरकारनं 300 कोटींची सोय केलीय.

त्यामुळे येत्या काही वर्षात नोकऱ्यांची संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा ठेवायला हरकत नाही. सरकारनं राज्यातली बेरोजगारी नष्ट करण्यासाठी कंबर कसलीय.

VIDEO: 'कोणा गणेशच्या जाण्याने पक्ष संपत नसतो'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobs
First Published: Jul 30, 2019 02:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...