S M L

कोल्हापुरात नारायण राणेंच्या पक्षाच्या ध्वजाचं अनावरण

कोल्हापूरमध्ये दसरा चौकात नारायण राणे यांची जंगभी सभा पार पडली.

Sachin Salve | Updated On: Dec 8, 2017 11:58 PM IST

कोल्हापुरात नारायण राणेंच्या पक्षाच्या ध्वजाचं अनावरण

08 डिसेंबर : काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर नारायण राणेंनी स्वत: चा पक्ष स्थापन केला. आज कोल्हापुरात राणेंनी आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या ध्वजाचं अनावरण करण्यात केलंय.

कोल्हापूरमध्ये दसरा चौकात नारायण राणे यांची जंगभी सभा पार पडली. 35 जिल्ह्यांपैकी कोल्हापूर आपल्याला आवडतं. माझ्या स्वभावाशी मिळतंजुळतं असल्यानंच कोल्हापूरची निवड केल्याचं यावेळी राणेंनी सांगितलं.

आमदारकी सोडली, राजीनामा दिल्यावर राणे संपले, हे लिहिणारे राणेंना किती ओळखतात माहीत नाही असं राणे म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला.

मुंबई भकास व्हायला उद्धव ठाकरे जबाबदार आहे. मुंबई पालिकेत पैसे घेतल्याशिवाय टेंडर काढले जात नाही असा घणाघाती आरोप राणेंनी केला.

तसंच मी कधीही मातोश्रीवरील माहिती बाहेर काढली नाही. पण मातोश्रीवर बाळासाहेबांनी कुणी छळलं हे जाहीर करेल असा इशाराही राणेंनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2017 11:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close