महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता; अवकाळी पाऊस, गारपीटीनं नुकसान

पावसाचा योग्य अंदाज घेत सर्व धान्य आणि पीक काळजीपूर्वक झाकून ठेवावीत असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2019 06:11 PM IST

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता; अवकाळी पाऊस, गारपीटीनं नुकसान

नागपूर, 20 मार्च : नागपूर जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नागपूर जिल्ह्याच्या मौदा, पारशिवणी, सावनेर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे.

सध्या शेतकऱ्यांनी गहू, हरभराचं पीकं घेतलं आहे. पण या अवकाळी पावसामुळे संपूर्ण धान्याचं नुकसान झालं आहे. तर संत्री आणि आंब्याच्या बागांचंही मोठं नुकसान झालं आहे. आधीच पाणी टंचाई आणि त्यातून ढिगभर कर्जामुळे बळीराजा पुरता वाकला आहे. त्यात आता हवामानही साथ देत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.

दरम्यान, 24 तासात आणखी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचा योग्य अंदाज घेत सर्व धान्य आणि पीक काळजीपूर्वक झाकून ठेवावीत असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

नाशिकसोबतच भंडारा जिल्ह्यातही वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह गारा आणि पाऊस सुरू आहे. त्यामुळे भंडाऱ्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचंही मोठं नुकसान झालं आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी आता चिंतेत आहे. तर आणखी काही दिवस असंच वातावरण असेल. त्यामुळे धान्याची योग्य साठवण करून ठेवा.
स्कायमेट या संस्थेनं वर्तवला हवामानाचा अंदाज

2019 मध्ये सामान्यपेक्षा सरासरी कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेनं वर्तवला आहे. प्रशांत महासागराची स्थिती सध्या स्थिर नाही. त्यामुळे जून-जुलैमध्ये मान्सून कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. गेल्या 5-6 वर्षांपासून मान्सून चांगला नसल्याचंही स्कायमेटनं म्हटलं आहे.


VIDEO : भाजपप्रवेशानंतर रणजितसिंह वडिलांबद्दल म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 06:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...