VIDEO :अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि डाळींबाच्या बागा उद्ध्वस्त,कोट्यवधींचं नुकसान

VIDEO :अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि डाळींबाच्या बागा उद्ध्वस्त,कोट्यवधींचं नुकसान

शेकडो एकर जमिनीवरील फळबागांसह इतर पिकेही जमीनदोस्त झाली आहेत. कोट्यवधींचं नुकसान झालं आहे

  • Share this:

सागर सुरवसे, सोलापूर 31 मार्च : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. ऐन काढणीला आलेल्या द्राक्ष बागा आणि डाळिंबीच्या बागा या वादळी वारा आणि पावसामुळे झाल्या अक्षरशः आडव्या झाल्या आहेत.

याशिवाय जिल्ह्यातील शेकडो एकर जमिनीवरील फळबागांसह इतर पिकेही जमीनदोस्त झाली आहेत. यामध्ये मोहोळ तालुक्यातील राजेश जगताप या शेतकऱ्याची साडेतीन एकराची द्राक्षबाग जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळाले.

ही बाग जमीनदोस्त झाल्यामुळे जगताप यांचे तब्बल २५ ते २६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. येत्या आठवडाभरात या बागेत ४० ते ५० टन द्राक्षे तर १२ टन बेदाणा अपेक्षित होता. त्यातून त्यांना तब्बल २५ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र रात्रीच्या वादळी पावसाने सर्वकाही संपवले. त्यामुळे शासनाने पंचनामे करुन किमान नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राजेश जगताप  या शेतकऱ्याने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 05:27 PM IST

ताज्या बातम्या