पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वधुपित्याने वऱ्हाडींना दिले अनोखे रिटर्न गिफ्ट

'विवाह' हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण. हा क्षण आपल्या आयुष्याच्या संध्याकाळीही लक्षात राहावा, यासाठी विवाह सोहळ्यात अनोखे प्रयोग केले जातात.

संजय शेंडे संजय शेंडे | News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 07:00 PM IST

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वधुपित्याने वऱ्हाडींना दिले अनोखे रिटर्न गिफ्ट

अमरावती, 6 जून- 'विवाह' हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण. हा क्षण आपल्या आयुष्याच्या संध्याकाळीही लक्षात राहावा, यासाठी विवाह सोहळ्यात अनोखे प्रयोग केले जातात. सामाजिक संदेश देऊन विवाह सोहळा अविस्मरणीय केला जाताना दिसत आहे. अमरावतीतही सहाय्यक वनरक्षक असलेल्या वधूपित्याने कुठलाही मुहूर्त न पाहता पर्यावर्णावर प्रेम व्यक्त करत आपल्या लाडक्या कन्येच्या विवाहात वऱ्हाडी मंडळींना वेगवेगळ्या प्रजातीच्या पंधराशे फळ रोपांची भेट दिली.

MBBS च्या विद्यार्थिनीला मध्यरात्री पार्कमध्ये नेऊन डॉक्टरने केले लैंगिक शोषण

लोक हातात पिशवी अन् त्यात एक फळझाड घेऊन उभे होते. हे दृश्य काही एखाद्या नर्सरीमधील नाही, अथवा कृषीप्रदर्शनीमधील नाही, हे दृश्य आहे एका विवाह सोहळ्यातील. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व झाडाचे महत्त्व लोकांना कळावे, म्हणून वधूपित्याने आपल्या कन्येच्या लग्नात पंधराशे फळझाडे लग्नात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना भेट दिले. अमरावतीच्या तेलाई सेलिब्रेशन हॉलमध्ये पर्यावरण समतोल राखणे व झाडे लावा झाडे जगवा, हा संदेश देणारा विवाह सोहळा पार पडला. वनविभागात सहाय्यक वनरक्षक अशोक कवीटकर यांची कन्या कल्याणी कवीटकर हिचा विवाह डॉ.अंकित काळे यांच्यासोबत गुरुवारी पार पडला. परंतु हा विवाह सोहळा कायमचा लक्षात राहावा यासाठी वधूपिता अशोक कवीटकर यांनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश विवाहात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीपर्यंत पोहोचवला.

10 वीच्या निकालानंतर गोंधळून जाऊ नका, असं निवडा तुमचं करिअर

तब्बल पंधराचे फळरोपे वाटप केले. यामध्ये जाम, फळाची अकराशे, आंबा शंभर, सीताफळ शंभर,आवळा दोनशे असे एकूण पंधराशे फळ रोपांचे वाटप या विवाहात करण्यात आल्याचे वऱ्हाडी मंडळीने सांगितले.

Loading...


भडकलेल्या वळूचं भांडण सोडवण्यासाठी केला 'हा' अजब उपाय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2019 07:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...