नवसपूर्तीसाठी या यात्रेत महिला-पुरुषांना गळवंतीला लटकण्याची अनोखी परंपरा

नवसपूर्तीसाठी या यात्रेत महिला-पुरुषांना गळवंतीला लटकण्याची अनोखी परंपरा

नवनाथ मंदिरातून ही गळवंती विरभद्र महाराजांच्या मंदिरात पोहचते. एक-एक करत हजारो महिला-पुरुष या गळवंतीला लटकतात. नवसपूर्ती करतात. शेकडो वर्षांपासून ही अनोखी परंपरा हे गाव जपतय.

  • Share this:

शिर्डी, २१ एप्रिल- अहमदनगर जिल्ह्यात नवसपूर्तीसाठी महिला-पुरुषांना गळवंतीला लटकण्याची अनोखी परंपरा आजही जपली जाते. राहाता येथे विरभद्र देवाच्या यात्रेत गळवंती अर्थात बगाड्याला लटकून हजारो महिला-पुरुष आपला नवस पूर्ण करतात.

शिर्डीच्या शेजारी असलेल्या राहाता गावात सध्या विरभद्र महाराजांची यात्रा भरलीय. विरभद्र महाराजांच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हजारो भाविक विरभद्राच्या दर्शनासाठी गर्दी करताहेत. तीन दिवस हा उत्साह सुरु असतो. लहान मुले गळवंतीला लटकतात आणि या सजलेल्या गळवंतीची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते.

'नवनाथ मंदिरातून ही गळवंती विरभद्र महाराजांच्या मंदिरात पोहचते. एक-एक करत हजारो महिला-पुरुष या गळवंतीला लटकतात. नवसपूर्ती करतात. शेकडो वर्षांपासून ही अनोखी परंपरा हे गाव जपतय.'

- सागर सदाफळ, अध्यक्ष, विरभद्र मंदिर

'आपल्या झालेल्या इच्छापूर्तीनंतर ही बगाडाला गळी लागण्याची परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून अशा प्रकारे महिला पुरूष गळी लागतात मात्र कधीही कोणाला काही इजा झाली नाहीये. सकाळपर्यंत महिला रांग लावून उभ्या असतात. एक-एक करत सर्वजण बगाडाला गळी लागतात. यावेळी मोठा उत्साह या महिलांमध्ये बघायला मिळतो.

- महिला भाविक


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 08:43 PM IST

ताज्या बातम्या