रेल्वे मंत्र्यांच्या नावानं कोट्यवधींचा झोल; पियुष गोयल यांच्या मित्राला अटक?

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या नावानं लोकांना गंडा घालणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 18, 2019 03:06 PM IST

रेल्वे मंत्र्यांच्या नावानं कोट्यवधींचा  झोल; पियुष गोयल यांच्या मित्राला अटक?

मुंबई, 18 मार्च : मंत्र्यांचा पीए, मंत्र्यांच्या जवळचा असल्याचं सांगून लोकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. यापूर्वी देखील अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे. काही जण अद्याप देखील लोकांना चुना लावताना दिसत आहेत. दरम्यान, पियुष गोयल यांच्या नावाचा वापर करत पैसे उकळणाऱ्या एका इसमाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ज्योति कुमार अग्रवाल असं या इसमाचं नाव असून तो पियुष गोयल यांचा मित्र असल्याचं बोललं जात आहे.

रेल्वेमध्ये कंत्राट देण्याचं आमिष दाखवत लोकांकडून पैसे उकळण्याचा धंदा ज्योति कुमार अग्रवाल करत होता. पण, त्याचा खरा चेहरा अखेर जगासमोर आला. दरम्यान, पोलिसांनी ज्योति कुमार अग्रवाल याला बेड्या ठोकल्या असून त्याची चौकशी सुरू आहे. ज्योति कुमार अग्रवाल यानं एका व्यक्तिला रेल्वेत 60 कोटी रूपयांचं कंत्राट मिळवून देतो असं सांगितलं होतं.


मेहुल चोकसीने PM मोदींवर पूर्ण केली पीएचडी, समोर आला हा निष्कर्ष


Loading...

चौकशी सुरू

दरम्यान, रेल्वे मंत्र्यांचं नाव वापरून ज्योति कुमार अग्रवालनं आणखी काय उद्योग केले आहेत. त्यांच्या नावाचा वापर आणखी कुठे केला आहे. याचा तपास देखील सध्या पोलिसांकडून सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्योति कुमार अग्रवाल हा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासोबत शिकला आहे. याच गोष्टीचा वापर ज्योति कुमार अग्रवाल हा लोकांना गंडा घालण्यासाठी करत होता. याच्यावर करोडो रूपयांच्या गैरव्यवहारांचा देखील आरोप आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

यापूर्वी देखील मंत्र्यांच्या नावानं पैसे उकळणाऱ्या अनेकांना पोलिसांनी उघड पाडलं आहे. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना काळजी घ्या. खात्री करूनच कोणताही व्यवहार करा.


साखर झोपेत असतानाच आगीत होरपळून तिघांचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2019 01:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...