बिल्डरवर गोळीबार प्रकरण, कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी टोळी दोषी

नाशिकमधील इंदिरानगरमध्ये एका बांधकाम प्रकल्पावर जाऊन खंडणीसाठी धमकावत बिल्डरवर गोळीबार केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या टोळीला विशेष मोक्का कोर्टाने दोषी ठरविले आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 01:54 PM IST

बिल्डरवर गोळीबार प्रकरण, कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी टोळी दोषी

नाशिक, 12 एप्रिल :  नाशिक येथील इंदिरानगरमध्ये एका बांधकाम प्रकल्पास्थळी जाऊन खंडणीसाठी धमकावत बिल्डरवर गोळीबार केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या टोळीतील सदस्यांना विशेष मोक्का न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. संजय सिंग, अरविंद चव्हाण, विकासकुमार सिंह, संदीप शर्मा अशी चौघांची नावे आहेत. या चौघांनी 2011 साली खंडणीसाठी बिल्डरला धमकावून गोळीबार केला होता. या गोळीबारात एक महिला आणि पुरुष जखमी झाले होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास मुंबईतील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे देण्यात आला होता.

नेमकं काय आहे प्रकरण?

25 फेब्रुवारी 2011 रोडी नाशिकच्या पाथर्डीफाटा येथील पांडव लेणी परिसरातील एका बांधकाम प्रकल्पाच्या कार्यालयात विकास कुमार आणि संतोषकुमार सिंग शिरले. येथे या दोघांनी बिल्डर अशोक महेनानी यांना धमकावत गोळीबारदेखील केला. सुदैवानं महेनानी गोळीबारातून थोडक्यात बचावले. पण यात एक महिला आणि एक पुरूष जखमी झाले होते. यानंतर इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाचा अन्य बातम्या

VIDEO : मोदींच्या सभेपूर्वी भाषण रोखल्यानं दिलीप गांधी भडकले, म्हणाले...

50 हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय, महिन्याला कमवाल 30 हजार रुपये

'शरद पवार...तुम्हाला झोप तरी कशी येते?' नगरमधील सभेत मोदींचा हल्लाबोल

राज ठाकरे नांदेडमध्ये दाखल, रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 01:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close