S M L
Football World Cup 2018

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं वृद्धापकाळाने निधन झालंय.

Chandrakant Funde | Updated On: Jul 19, 2017 03:35 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन

मुंबई, 19 जुलै: मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं  वृद्धापकाळाने निधन झालंय. निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांच्या त्या पत्नी होत्या.

उमा हे नाव त्यांना लता मंगेशकर यांनी दिलं होतं. त्यांचं मूळ नाव अनुसया होतं. 60 ते 70च्या दशकात त्यांनी अनेक उत्तम सिनेमांमध्ये नायिकेच्या भूमिका साकारल्या.

आम्ही जातो आमच्या गावा, भालू, पाच रंगाची पाच पाखरे आणि हिंदीतील दोस्ती इत्यादी चित्रपटात त्यांनी काम केलं. मराठीसह तमिळ आणि तेलगू चित्रपटांतही अभिनय केला होता.

उमा भेंडे गाजलेली गाणी - गंध फुलांचा गेला सांगून, हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार, देहाची तिजोरी...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close