उल्हासनगरच्या उपायुक्ता विजया कंठेनी लाच मागतानाचा व्हिडिओ व्हायरल

पालिका उपायुक्त विजया कंठे यांनी काम करून हवे असेल तर मला 50 हजार रुपये दे अशी मागणी केली असा आरोप झनकर यांनी केलाय.

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 19, 2017 01:01 PM IST

उल्हासनगरच्या उपायुक्ता विजया कंठेनी लाच मागतानाचा व्हिडिओ व्हायरल

उल्हासनगर, 19 ऑक्टोबर : उल्हासनगर महापालिकेच्या उपायुक्त विजया कंठे हे 50 हजार रुपयांची लाच मागत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला असून, राजू झनकर या व्यक्तीकडे घरासमोरील रस्त्याच्या रुंदीकरण करण्यासाठी लाच मागीतल्याचं, राजू झनकर यांनी सांगितलं. मात्र महापालिका उपायुक्त विजया कंठे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे .

उल्हासनगर कॅम्प 5 नंबर येथे राजू झनकर यांची मालमत्ता असून रस्ता अरुंद आहे. हा रस्ता रुंद व्हावा यासाठी गेली 1 वर्ष राजू झनकर लढा देत आहेत. याकरिता त्यांनी उपोषण पण केलं. मात्र पालिका उपायुक्त विजया कंठे यांनी काम करून हवे असेल तर मला 50 हजार रुपये दे अशी मागणी केली. असा आरोप झनकर यांनी केलाय. हा सगळा प्रकार राजू झनकर याने मोबाईलमध्ये शूट केला आणि तो वायरल केला. त्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे मात्र पालिका उपायुक्त विजया कंठे यांनी हे सर्व आरोप खोटे आणि आपल्या विरुद्ध सुरू असलेल्या षडयंत्राचा भाग असल्याचे सांगितलं, प्रकरण न्यायालयात असल्याने अधिक बोलण्यास नकार दिला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2017 01:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close