Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विद्यार्थ्यांच्या ताटात निकृष्ट जेवण, मनसैनिकांनी आचाऱ्याच्या लगावली कानशिलात
  • VIDEO: विद्यार्थ्यांच्या ताटात निकृष्ट जेवण, मनसैनिकांनी आचाऱ्याच्या लगावली कानशिलात

    News18 Lokmat | Published On: Apr 10, 2019 10:05 AM IST | Updated On: Apr 10, 2019 10:05 AM IST

    उल्हासनगर, 10 एप्रिल : मनसैनिकांनी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण देणाऱ्या शासकीय वसतीगृहातील आचाऱ्याच्या कानशीलात लगावली. उल्हासनगरमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील 25 विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. यासंदर्भात विद्यार्थी आणि वसतीगृहातील अधिकाऱ्यांबरोबर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू होती. यावेळी चिडलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यानं आचाऱ्याला थोबाडीत मारली. निकृष्ट जेवण, खराब फळं, थकलेले भत्ते, अभ्यासाठी पुस्तकं मिळत नसल्यानं या वसतीगृहातील विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जोपर्यंत स्वतः चौकशी करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी