प्रेमात 50 लाख उडवले, अन् लग्नास नकार दिला म्हणून व्हिडिओ काॅल करून जीवन संपवले

उल्हासनगर तरुणाने तरुणीला व्हिडिओ कॉलवर पंखा, ओढणी दाखवली आणि त्याच पंख्याला त्याच ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2017 11:10 PM IST

प्रेमात 50 लाख उडवले, अन् लग्नास नकार दिला म्हणून व्हिडिओ काॅल करून जीवन संपवले

19 जून : गेली सात वर्ष प्रेम संबंध ठेवून आता दुसऱ्या सोबत लग्न करणाऱ्या तरुणीला, तरुणाने व्हिडिओ कॉल केला आणि 'तू तुझे जमलेले लग्न मोड़ आणि माझ्यासोबत लग्न कर', मात्र तरुणीने न ऐकल्याने, तरुणाने तरुणीला व्हिडिओ कॉलवर पंखा, ओढणी दाखवली आणि त्याच पंख्याला त्याच ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी  येथील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

हनी नरेश आसवाणी (25) या तरुणाचे राखी (20) या नालासोपारा येथे राहणाऱ्या तरुणी सोबत प्रेमसंबंध होते. मात्र 2 वर्षांपूर्वी आई वडील तयार नाही असं सांगुन मुलीने प्रेमसंबंध तोडले. मात्र काही महिन्या पूर्वी दोघे पुन्हा एकदा एकत्र आले. गेल्या महिन्यात मुलगी हनीला भेटण्यासाठी आली होती दोघे कल्याण टिटवाला रोडवर असणाऱ्या रेड चिल्ली हाॅटेलमध्ये भेटले होते. हनीने सुमारे 50 लाख रुपये या मुलीला वेग वेगळ्या भेट वस्तु देण्यात उडवले, आणि आता मात्र ती दुसऱ्या सोबत लग्न करण्यास निघाली होती, याचा राग हनीला होता, तो तिला लग्न न करण्या बाबत सांगत होता, मात्र तरुणीने त्याची चेष्टा केली, त्याचा राग येवून तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली.

पोलिसांनी याप्रकरणी हनीचा मोबाईल साइबर लॅबमध्ये पाठवला आहे, त्याने जो  व्हिडिओ केला होता त्याचे रिकॉर्ड मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याप्रकरणी मुलीला ताब्यात घेवून चौकशी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2017 11:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...