S M L

रस्ते एवढे खराब असतील याची कल्पनाही नव्हती, निकम संतापले

महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त झाल्याचा दावाही दरवर्षी सरकारकडून केला जात आहे.

Updated On: Nov 18, 2018 12:41 PM IST

रस्ते एवढे खराब असतील याची कल्पनाही नव्हती, निकम संतापले

पंकज क्षीरसागर, परभणी, 18 नोव्हेंबर : मराठवाड्यातील चाळणी झालेल्या रस्त्यांमुळे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘एवढे खराब रस्ते असतील याची कल्पनाही नव्हती,’ असं म्हणत निकम यांनी रस्त्यांच्या स्थितीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी उज्ज्वल निकम यांनी औरंगाबाद ते परभणी प्रवास केला. रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात असलेल्या खड्ड्यांमुळे या प्रवासासाठी निकम यांना प्रचंड वेळ लागला. त्यानंतर उज्ज्वल निकमांनी रस्त्याबद्दलची नाराजी भाषणातून व्यक्त केली आहे.

‘मराठवाड्यातील रस्त्यांची स्थिती चिंता करण्यासाठी आहे. याबाबत मी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा करणार आहे, असंही निकम म्हणाले.


दरम्यान, परभणीच्या ‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा’मध्ये ‘युवकांची सामाजिक जबाबदारी आणि भविष्यातील आव्हानं’ या विषयावर अॅड. उज्ज्वल निकम यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

महाराष्ट्रातील अनेक भागातील रस्त्यांची स्थिती खराब आहे. त्यामुळे अपघाताच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. दुसरीकडे, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील मात्र सातत्याने खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा करत आहेत.

महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त झाल्याचा दावाही दरवर्षी सरकारकडून केला जात आहे. आता विशेष सरकारी वकील असणाऱ्या उज्ज्वल निकम यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर तरी सरकार काही पाऊलं उचलणार का, हे पाहावं लागेल.

Loading...


Video : 'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 18, 2018 12:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close