खा. उदयन राजेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, प्रकृती खालावल्याने राजे रुग्णालयात

खा. उदयन राजेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, प्रकृती खालावल्याने राजे रुग्णालयात

साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना खंडणीच्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. आज सकाळीच ते स्वतःहून सातारा पोलीस ठाण्यात हजर झाले होते.

  • Share this:

सातारा, 25 जुलै: साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना खंडणीच्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. आज सकाळीच ते स्वतःहून सातारा पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर केलं होतं. दरम्यान, प्रकृती अस्वस्थ झाल्याने उदयन राजेंना साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. उदयन राजे यांच्यावरील अटकेच्या कारवाईविरोधात त्यांच्या समर्थकांनी सातारा शहरात कडकडीत बंद पुकारलाय. या बंदचे काही  ठिकाणी हिंसक पडसादही उमटलेत. शहरात एसटी बसही फोडण्यात आलीय. खासदारांच्या समर्थकांनी पुकारलेल्या बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सातारा शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलीय.

लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण आणि खंडणी मागितल्या प्रकरणी खा. उदयनराजे आणि त्यांच्या 9 साथीदारांवर 22 मार्च रोजी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात 9 जणांना पोलिसांनी 23 मार्चला अटक केली होती मात्र तेंव्हापासून खा. उदयनराजे अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर उदयनराजे काही दिवसांपूर्वी अचानक साताऱ्यात प्रकटले आणि त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सातारा शहरात रोड शो केला आणि पुन्हा गायब झाले. उदयनराजेंच्या या रोड शो दरम्यान पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने बरीच टीकाही झाली. त्यानंतर आज अखेर खासदार उदयन राजे सातारा पोलिसांसमोर स्वतःहून हजर झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2017 12:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...