मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेनेला फोन नाही - उद्धव ठाकरे

'आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपकडून कोणताही फोन आलेला नाही आणि आम्हीही केलेला नाही, त्यामुळे शिवसेना सत्तेसाठी लालसी असण्याचा प्रश्नच येत नाही. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या मंत्रिमंडळ विस्तारातील सहभागाबाबत खुलाला केलाय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2017 02:03 PM IST

मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेनेला फोन नाही - उद्धव ठाकरे

मुंबई, 2 सप्टेंबर : 'आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपकडून कोणताही फोन आलेला नाही आणि आम्हीही केलेला नाही, त्यामुळे शिवसेना सत्तेसाठी लालसी असण्याचा प्रश्नच येत नाही. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या मंत्रिमंडळ विस्तारातील सहभागाबाबत खुलाला केलाय.

उद्धव ठाकरे म्हणाले, '' मी सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि नाना पटोलेचं विधान या दोन बातम्या बघतोय त्यामुळे अशा भीतीच्या सावटाखाली मंत्रिमंडळात खरंच सहभागी व्हायचं का, अशा गोंधळात मी पडलोय.'' असं सांगत उद्धव ठाकरेंनी नाना पटोलेंच्या विधानावरूनही भाजपवर शरसंधान केलंय.

देशात सध्या सगळ्यांना मंत्रिमंडळ विस्ताराची काळजी असली तरी शिवसेनेला मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी आहे. म्हणूनच आम्ही आरोग्य शिबिरं भरवतोय, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2017 02:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...