'महाराष्ट्राचा गझनी'म्हणत नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

'महाराष्ट्राचा गझनी'म्हणत नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

या व्यंगचित्रात त्यांनी उद्धव ठाकरेंना गझनी म्हणून दाखवलंय आणि त्यांच्या शरीरावर शिवसेनेच्या अनेक राजकीय भूमिका लिहिल्या आहेत.

  • Share this:

16 जुलै: काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे 'महाराष्ट्राचा गझनी' या नावाने एक व्यंगचित्र रेखाटून त्यांच्यावर सडकून टीका केलीय.या व्यंगचित्रात त्यांनी उद्धव ठाकरेंना गझनी म्हणून दाखवलंय आणि त्यांच्या शरीरावर शिवसेनेच्या अनेक राजकीय भूमिका लिहिल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी आमिर खानचा गझनी हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात आमिर खान गझनीच्या भूमिकेत होता. गझनी सिनेमात आमिर खान काही मिनिटात सारं काही विसरायचा आणि गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी तो त्या स्वत:च्या शरीरावर लिहून ठेवायचा. तशीच काहीशी टीका करणारी व्यक्तिरेखा नितेश राणेंनी त्यांच्या व्यंगचित्रात रेखाटलीय. या व्यंगचित्राच्या खाली नितेश राणे यांचे नाव आहे. त्यामुळे नितेश राणे हे कधीपासून व्यंगचित्रकार झाले असा प्रश्नदेखील विचारला जाऊ लागलाय.हे व्यंगचित्र त्यांनी ट्विटरवर शेअरही केलंय.

तसंच यापूर्वी 'आम्ही राज्य सरकारचा पाठिंबा काढू', हे वाक्य सर्वाधिक बोलण्याचा विक्रम केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी, अशा आशयाचं पत्रही नितेश राणे यांनी थेट गिनीज बुकलाच लिहिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2017 12:18 PM IST

ताज्या बातम्या