उद्धव ठाकरेंकडून मेट्रो 3च्या कामाची पाहणी, फटाके बंदीलाही विरोध

उद्धव ठाकरेंकडून मेट्रो 3च्या कामाची पाहणी, फटाके बंदीलाही विरोध

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज मुंबईतल्या मेट्रो 3च्या प्रकल्पाची पाहणी केली. त्यासाठी ते आझाद मैदानातल्या बांधकाम साईटवर आले होते. यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्रीही आवर्जून उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी मेट्रो 3 प्रकल्पांमुळे बाधीत झालेल्या स्थानिक रहिवाशांच्या समस्याही जाणून घेतल्या. फटाक्यांच्या बंदीबाबत उद्धव ठाकरेंना विचारलं असता त्यांनी आता पंचागच फाडून टाका, म्हणजे सण-वार हे विषय येणारच नाहीत, फटाके फोडण्याचा प्रश्नच नाही असं उत्तर दिलं.

  • Share this:

मुंबई, 11 ऑक्टोबर : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज मुंबईतल्या मेट्रो 3च्या प्रकल्पाची पाहणी केली. त्यासाठी ते आझाद मैदानातल्या बांधकाम साईटवर आले होते. यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्रीही आवर्जून उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी मेट्रो 3 प्रकल्पांमुळे बाधीत झालेल्या स्थानिक रहिवाशांच्या समस्याही जाणून घेतल्या. तसंच त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित केला. मेट्रोच्या प्रकल्पग्रस्तांनी यापूर्वीही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनेनं आरे कॉलनीतील पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित करून मेट्रो प्रकल्पाला विरोध केला होता. पण आजच्या भेटीनंतर मात्र, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समजाऊन घेतले जातील, अशी सावध प्रतिक्रिया शिवसेनेनं दिलीय.

दरम्यान, फटाक्यांच्या बंदीबाबत उद्धव ठाकरेंना विचारलं असता त्यांनी आता पंचागच फाडून टाका, म्हणजे सण-वार हे विषय येणारच नाहीत, फटाके फोडण्याचा प्रश्नच नाही असं उत्तर दिलं. मराठी माणसाच्या सणांवर गदा आलेली शिवसेनेला अजिबात खपवून घेणार नाही असंही ते म्हणाले. फटाकेबंदीवरून शिवसेना नेत्यांमध्येच मतभेद पाहायला मिळाले होते त्यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी फटाकेबंदीला शिवसेनेचा विरोधच असल्याचं स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2017 04:53 PM IST

ताज्या बातम्या