कर्जमुक्ती शिवसेनेमुळे मिळाली - उद्धव ठाकरे

यापुढेही सरकारच्या बोकांडी बसून मागण्या मान्य करून घ्यायच्या म्हणजे घ्यायच्या.पिंपळगावातल्या शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2017 02:50 PM IST

कर्जमुक्ती शिवसेनेमुळे मिळाली - उद्धव ठाकरे

प्रशांत बाग, 25 जून : कर्जमुक्ती शिवसेनेमुळे मिळाली.यापुढेही सरकारच्या बोकांडी बसून मागण्या मान्य करून घ्यायच्या म्हणजे घ्यायच्या.पिंपळगावातल्या शेतकऱ्यांशी  बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बहुलापासून नगर जिल्ह्यातील पुणतांबे दरम्यान ते अनेक भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफीची घोषणा केली असली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेची आक्रमकता कायम राहणार  असल्याचा इशारा देण्यासाठी हा दौरा असल्याचं मानलं जातंय.

कर्जमाफीच्या घोषणेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा पूर्वनियोजित दौरा रद्द होईल अशी चर्चा होती. या दौऱ्यात उद्धव ठाकरे जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांची भेट घेणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

कर्जमाफीच्या घोषणेनंतरही राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासह त्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी शिवसेना आक्रमक असल्याची संधी या दौऱ्यामुळे सेनेला आहे. भाजपकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीवरून सरकार दरबारी खेळल्या जात असलेल्या राजकारणाला शह देण्यासाठी शिवेसना रस्त्यावर उतरली होती. उद्धव ठाकरे हे २५ जूनपासून राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी दौऱ्यावर निघणार होते.

Loading...

त्या पार्श्वभूमीवर भाजपने उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा करून या दौऱ्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीच्या घोषणेमुळे उद्धव ठाकरेंना दौरा रद्द करावा लागेल अशी भाजपच्या गोटात अपेक्षा होती. परंतु उद्धव ठाकरेंचा नियोजित दौरा होत असल्यानं युतीतील या दोघा प्रमुख पक्षातील कुरघोडीची राजकीय चढाओढ येत्या दिवसात शेतकऱ्यांना दिलासा देणारी असेल का ? की  स्वतःचं राजकारण जिवंत ठेवणारी असेल ? हेही या दौऱ्यानं स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2017 02:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...