उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेल्या आमदाराची भेट नाकारली!

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेल्या आमदाराची भेट नाकारली!

दरम्यान, राजीनामा दिलेले आमदार हर्षवर्धन जाधव मातोश्रीवर पोचले. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटीची वेळ दिली नाही.

  • Share this:

मुंबई, ता. 30 जुलै : मराठा आरक्षणाबाबत आज उद्धव ठाकरेंनी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली होती. दरम्यान, राजीनामा दिलेले आमदार हर्षवर्धन जाधव मातोश्रीवर पोचले. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटीची वेळ दिली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शिवसेना भाजपसोबत जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मराठा आरक्षणाबाबत सेनेनं नेमकी काय भूमिका घ्यावी, यावर या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेले सेनेचेच आमदार हर्षवर्धन जाधव मातोश्रीवर पोचले. पण उद्धव ठाकरे यांनी जाधवांना भेटण्यास नकार दिला. त्यानंतर मातोश्रीवर पूर्व नियोजित बैठक पार पडली.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आमदारकीचा राजीनामा दिलेले हर्षवर्धन जाधव यांनी आज मुंबईत मंत्रालय जवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन सुरू केलंय. सरकारमुळेच हे ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आपल्यावर आल्याचं सांगत, राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली. न्यूज18 लोकमतचे बातमीदार सागर कुलकर्णी यांनी हा सगळा स्टटं आहे का? असे विचारताच जाधव चांगलेच भडकले. तुम्हाला दाखवायचे असल्यास दाखवा मी बंधनकारक करत नाही, असे म्हणत त्यांचा राग अनावर झाला.

 

VIDEO : मराठा आंदोलनात नांगरे पाटलांची एंट्री, तरुणाने पडल्या पाया !

 

शिवसेनेची बैठक संपली, मराठा आरक्षणासाठी शिवसेना भाजपसोबत!

मराठा आरक्षणाबाबत आज उद्धव ठाकरेंनी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली होती. गृहराज्यमंत्री आणि सेनेचे कोकणातले नेते दीपक केसरकर यांच्यासह सेनेचे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर दुपारी ४ वाजता सेनेच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्काळ सोडविण्यासंदर्भातले निवेदन दिले. बैठकीत मराठा आरक्षणासाठी शिवसेना भाजपसोबत राहणार असल्याचे निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मराठा आरक्षणाबाबत सेनेनं नेमकी काय भूमिका घ्यावी, यावर या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर बैठकीला उपस्थित सेनेच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्काळ मार्गी लावण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली. कुठल्याही अहवालाची वाट न बघता, विशेष अधिवेशन बोलवावे असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. इतर समाजाला दिलेल्या आरक्षणातून एक टक्काही कमी न करता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. यावेळी उपस्थित सेनेच्या सर्व आमदारांना मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तातडीने निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

 

आता आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, 1 ऑगस्टपासून करणार 

 

मराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत !

मराठा आरक्षणासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलीये. सर्व आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. तसंच काँग्रेसचे आमदार राज्यपाल यांच्या भेट घेण्यासाठी गेले आहे. मराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे आमदार विशेष अधिवेशनाची मागणी करणार आहे. याआधीही काँग्रेसचे आमदार पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय.

विशेष म्हणजे, आतापर्यंत 6 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. मात्र प्रत्यक्षात औरंगाबादच्या कन्नड मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवलाय. तर इतर पाच आमदारांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पोहोचलाच नसल्याची माहिती समोर आलीय.मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर आणि रमेश कदम भाजपच्या सीमा हिरे आणि राहुल आहेर, तसंच काँग्रेसचे भारत भालके यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवलीय. त्यानुसार राजीनामा देण्यासाठी आमदारांनी स्वतः विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवणं अपेक्षित असतं. मात्र हर्षवर्धन जाधव सोडून आणखी कोणत्याही आमदारांनी ते धाडस दाखवलेलं नाही.

दरम्यान, आज पुण्यात चाकण परिसरात आंदोलकांनी जबरदस्त तोडफोड केली आहे. तब्बल 100 ते 150 गाड्या आंदोलकांनी फोडल्या आहे. तर 25 पेक्षा जास्त गाड्या पोलिसांकडून जाळण्यात आल्या आहे. पुण्यातल्या चाकण जवळच्या तळेगाव चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी दिसेल त्या गाड्या पेटवून दिल्या आहे. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. तर एसटी बसेसलाही आंदोलकांनी आग लावली आहे. काही बसेस तर जळून खाक झाल्या आहेत. हंडेवाडी परिसरात आंदोलकांनी टायर्स जाळून रास्ता रोको केला आहे. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केलं आहे.

हेही वाचा..

 प्रत्येक जातीला पोट असतं, पण पोटाला जात लावू नका - उद्धव ठाकरे

खडसेंच्या आवाजातली ऑडिओ क्लिप VIRAL, भाजपातले वाद पुन्हा चव्हाट्यावर

FB पोस्ट टाकून तरूणाची रेल्वेखाली आत्महत्या, मराठा आरक्षणासाठी 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2018 07:39 PM IST

ताज्या बातम्या