भाजपशी आम्ही युती करणार नाही या निर्णयावर ठाम आहोत - उद्धव ठाकरे

सध्या उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय.तसंच पावसाळी अधिवेशन मुंबईऐवजी नागपुरात व्हावं, या भाजपच्या प्रस्ताव शिवसेनेकडून विरोध करण्यात आलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2018 10:56 AM IST

भाजपशी आम्ही युती करणार नाही या निर्णयावर ठाम आहोत - उद्धव ठाकरे

औरंगाबाद, 20 एप्रिल : विधानसभा 2019च्या निवडणुकीसाठी भाजपशी आम्ही युती करणार नाही हे आधीच स्पष्ट केलंय, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपण आपल्या निर्णयावर ठाम राहणार असल्याचं सांगितलंय. सध्या उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय.

तसंच पावसाळी अधिवेशन मुंबईऐवजी नागपुरात व्हावं, या भाजपच्या प्रस्ताव शिवसेनेकडून विरोध करण्यात आलाय. पावसाळी अधिवेशन मुंबईतच झालं पाहिजे, यावर शिवसेना ठाम असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनावरून भाजप आणि शिवसेना परत एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2018 11:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...