काँग्रेसची 15 वर्षं भांडी घासणाऱ्यांनी सत्तेतून बाहेर पडायचं सांगू नये-उद्धव ठाकरे

आता "हे माझं सरकार नाही आणि मी लाभार्थी नाही" अशी जाहिरातच करावी लागणार आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 25, 2017 09:06 PM IST

काँग्रेसची 15 वर्षं भांडी घासणाऱ्यांनी सत्तेतून बाहेर पडायचं सांगू नये-उद्धव ठाकरे

25 नोव्हेंबर : सत्तेत नांदता येत नाही तर वेगळं व्हा असं सांगणाऱ्या शरद पवारांनी 15 वर्ष बाईची भांडी घासलीये त्यांनी आम्हाला सांगू नये अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घणाघाती प्रहार केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहे. आज नेसरी इथं जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी सरकारवर त्यांनी विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केलीय.

"या मंत्रिमंडळात मला रस नाही"

मी सरकारवर टीका करतोय हे सरकार 5 वर्ष टिकावं म्हणून. मी सरकारमध्ये राहून बोलतोय कारण इथल्य सामान्य माणसांच्या व्यथा कमी करायच्या आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी वाल्याचा वाल्मिकी कधी केला नाही. पण हे मुख्यमंत्री गुंडाना घेऊन कारभार करत आहेत. या मंत्रिमंडळात मला रस नाही. मला माझं हक्काचं मंत्री मंडळ हवंय असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मी लाभार्थी नाही

Loading...

उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांकडे पाणी, वीज नसल्यामुळे पिकं जळून जात आहेत. सरकार म्हणतंय "हे माझं सरकार, मी लाभार्थी" पण आता "हे माझं सरकार नाही आणि मी लाभार्थी नाही" अशी जाहिरातच करावी लागणार आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

"...तर 'मन की बात' सांगणारा रेडिओ जळून खाक होईल"

चंद्रकांत पाटील म्हणतात खड्डे पडले तर आभाळ पडणार नाही पण सरकार मात्र पडेल अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली. तसंच दहशतवादाचा बिमोड आपले जवानांमुळे होतोय. नोटबंदीमुळे नाही. आपल्या सर्वांची मनं एकत्र आली तर 'मन की बात' सांगणारा रेडिओ जळून खाक होईल असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केलीये.

 आम्ही गेलो की हे नांदायला जाणार"

शरद पवार म्हणतात,सत्तेत नांदता येत नाही तर वेगळं व्हा..अरे वा...म्हणजे आम्ही वेगळं होताच...हे नांदायला जाणार. हे त्यांचं राजकारण.. ते काय आम्हाला समजत नाही. १५ वर्ष काँग्रेसची भांडी घासली आणि आम्हाला सांगतात. सत्तेत कशाला राहतात अशा शेलक्या शब्दात उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली.

गुजरात मधला व्यापारी रस्त्यावर उतरलाय. तुम्ही का नाही उतरत. तुमची तयारी असेल तर माझी साथ तुमच्या सोबत आहे असं आवाहनच उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीला दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2017 09:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...