कर्जमाफीसाठी अटी कशाला ?-उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांना जून 2017 पासून कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2017 09:08 PM IST

कर्जमाफीसाठी अटी कशाला ?-उद्धव ठाकरे

29 जून : शेतकऱ्यांना जून 2017 पासून कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडलीये. ते नांदेडमध्ये बोलत होते.

कर्जमाफी जाहीर करताना जून 2016 पर्यंतची अट कशाला असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. कर्जमाफीसाठी 2016 साठीचा निकष ठेवल्यानं शेतकरी कर्जबाजारीच राहणार आहे असंही उद्धव म्हणाले.

दरम्यान, या सभेच्या आधी उद्धव ठाकरेंसमोरच सेना आमदार हेमंत पाटील आणि सेना नेते विनायक राऊत यांच्यात चांगलाच राडा झाला. उद्धव ठाकरे स्टेजवर येताच माईक कुणाकडे द्यायचा यावरून दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2017 06:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...