योगी हे भाजपचे भाडोत्री प्रचारक, उद्धव ठाकरेंचा पलटवार

भाजपला पालघरमध्ये स्वत:चा उमेदवार मिळाला नाही, प्रचारक मिळाला नाही त्यामुळं उत्तरप्रदेशातून भाडोत्री उमेदवार आणवा लागला असा पलटवार त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर केला.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: May 23, 2018 09:17 PM IST

योगी हे भाजपचे भाडोत्री प्रचारक, उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुंबई,ता.23 मे: योगा आदित्यनाथ यांची विरारमध्ये प्रचारसभा होत असताना वसईत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली. भाजपला पालघरमध्ये स्वत:चा उमेदवार मिळाला नाही, प्रचारक मिळाला नाही त्यामुळं उत्तरप्रदेशातून भाडोत्री उमेदवार आणवा लागला असा पलटवार त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर केला.

गोरखपूरमध्ये हॉस्पिटलमध्ये मुलांचा मृत्यू झाला. आणि योगी इथं विकासाच्या गप्पा कशा मारू शकतात असा सवाल त्यांनी केला. भाजपने चिंतामण वनगांच्या कुटूंबाची उपेक्षा केली, आत्तापर्यंत पालघर भाजपसाठी सोडला होता त्यामुळंच ते माजले अशी टीकाही त्यांनी केली.

वनगांच्या कुटूंबियांना शिवसेनेनं विकत घेतलं हे मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करून दाखवावं असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2018 09:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...