उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांची भेट हाच नारायण राणेंचा विजय -नितेश राणे

उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांची भेट हाच नारायण राणेंचा विजय -नितेश राणे

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यातच नारायण राणेंचा विजय आहे.

  • Share this:

16 फेब्रुवारी : नाणारचा प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प हा कोकणाला उद्ध्वस्त करणारा प्रकल्प असून ज्या कोकण पट्ट्याने सेनेला २४ आमदार देऊन ताकद दिली त्या कोकणाला उद्धव ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते उद्ध्वस्त करायला निघाल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केलीये. ते बदलपुरात बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यातच नारायण राणेंचा विजय आहे. नारायण राणेंची दखल उद्धव ठाकरे यांची सेना घेते हे दाखवणारी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची भेट आहे असा चिमटाही नितेश यांनी काढला.

तसंच सेनेला जर खरंच या रिफायनरीला विरोध करायचा असेल तर मॅग्नेटिक महारष्ट्र या कार्यक्रमात ग्रीन रिफायनरी आणि सरकार यांच्यात होणारा करार रद्द करून दाखवा असं आवाहनही  नितेश राणे यांनी सेनेला केलाय.

उद्धव यांना आपल्या उद्योग मंत्र्यांचा ग्रीन रिफायनरी सोबतचा या  कराराबाबत माहित नाही का असा सवाल करत हे सर्व कोकणी जनतेच्या डोळ्यात धुळफेक आहे अशी टीका राणे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2018 06:57 PM IST

ताज्या बातम्या