S M L

'पाकचा क्रिकेटपट्टू झाला पंतप्रधान; आमच्याकडे PM बनण्याचे स्वप्न पाहणारा क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष'

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे बोलत असताना शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

Updated On: Mar 15, 2019 09:39 PM IST

'पाकचा क्रिकेटपट्टू झाला पंतप्रधान; आमच्याकडे PM बनण्याचे स्वप्न पाहणारा क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष'

नागपूर, 15 मार्च : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. पाकिस्तानात क्रिकेटपट्टू पंतप्रधान झाला. तर, भारतात पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहणारा क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष झाला अशी टीका उद्धव यांनी केली आहे. नागपुरातील जाहीर सभेत बोलताना त्यांनी ही टीका केली. शिवसेना - भाजप जरी कोल्हापुरातून प्रचाराचा नारळ फोडणार असले तरी, सध्या कार्यकर्त्यांच्या मनोमिलनासाठी दोन्ही पक्षांकडून मराठवाडा, विदर्भात सभा घेतल्या जात आहेत.

दरम्यान, माढा या मतदारसंघातून यापूर्वीच शरद पवार यांनी उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यावरून देखील विरोधकांनी पवारांवर टीकास्त्र डागलं. शरद पवार यांनी माघार घेत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे.CSMT पूल दुर्घटना: पालिकेचे मुख्य आणि सहाय्यक अभियंता निलंबित


'मोदींना पर्याय दाखवा?'

Loading...

सामना, जाहीर सभेतून वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांनी आता मोदींना पर्याय दाखवा? असा सवाल केला. शिवाय, आमच्यात मतभेद झाले उद्या पण होतील. पण, ते व्यक्त करण्याची पद्धत बदलू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.


आणखी काय म्हणाले उद्धव?

यावेळी त्यांनी नाणारला विरोध होता. तो निर्णय देखील बदलला. समृद्धी हायवेबाबत शेतकऱ्यांच्या समस्या होत्या त्या सरकारनं सोडवल्याचं उद्धव यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही एकत्र आल्यानं हिंदू विरोधकांना चपराक बसल्याचं देखील उद्धव यांनी यावेळी म्हणत विरोधकांना लक्ष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी आम्हाला विदर्भातील 10 नाही तर महाराष्ट्रातील 48 जागा जिंकायच्या आहेत अशा शब्दात त्यांनी विरोधकांना थेट आव्हान दिलं.


SPECIAL REPORT : माढ्याचा तिढा, कोण उचलणार विडा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 09:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close