काय बोलणार उद्धव ठाकरे? दसरा मेळाव्यानंतर ठरणार युतीचं गणित!

दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पक्षाची काय भूमिका जाहीर करतात याकडे इतर पक्षांपेक्षा भाजपचं जास्त लक्ष राहणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2018 07:31 AM IST

काय बोलणार उद्धव ठाकरे? दसरा मेळाव्यानंतर ठरणार युतीचं गणित!

उदय जाधव, मुंबई, ता.18 ऑक्टोबर : गुरूवारी होणाऱ्या शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळावाकडे सर्व राजकिय पक्षांचं लक्षं लागलं. दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पक्षाची काय भूमिका जाहीर करतात याकडे इतर पक्षांपेक्षा भाजपचं जास्त लक्ष राहणार आहे. उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देणार की युतीबाबत सकारात्मक राहणार हे दसऱ्या मळाव्यातल्या त्यांच्या भाषणावर ठरणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी मोठ्या राणा भीमदेवी थाटात 'एकला चलो रे'ची घोषणा केली होती. पण महामंडळाच्या नियुक्त्या करताना शिवसेनेने कोणतीही कुरबूर न सर्व नियुक्त्या मान्य केल्या. भाजपच्या सर्वच नेत्यांनी शिवसेनेला आगामी निवडणुकीत युती करण्यासाठी हात पुढं केला.

मात्र सेना आपल्या स्वबळाच्या घोषणेवर ठाम आहे. त्यामुळं शिवसेना खरंच स्वबळावर लढणार की भाजपसोबत जाणार यावर राज्यातलं राजकीय गणित अवलंबून आहे. त्यातच राम मंदिराचा मुद्दा घेऊन सेना पुन्हा एकदा आक्रमक झालीय. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे मिशन अयोध्याची रितसर घोषणाही करणार आहेत.

डिसेंबर महीन्यात देशातील पाच राज्यात विधानसभेसाठी निवडणुका होत आहेत. यापैकी राजस्थान आणि मध्य प्रदेशात शिवसेना निवडणूक लढवणार आहे. ते देखील भाजपच्या विरोधात. अर्थात या राज्यांमध्ये शिवसेनेची फारशी ताकद नाहीये. मात्र भाजपसाठी ते त्रासदायक ठरू शकते.

यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेनं राम मंदिराच्या माध्यमातून पुन्हा एकदा आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणार आहे. या मेळ्याव्यात उद्धव ठाकरे त्यांच्या अयोध्देच्या दौऱ्याची तारीख घोषित करणार आहेत. या भाषणात ते पुन्हा भाजप आणि नरेंद्रम मोदींना लक्ष्य करणार की काँग्रेस-राष्ट्रवादी या विरोधपक्षांचा समाचार घेणार आहे गुरूवारच्या भाषणात स्पष्ट होणार आहे.

Loading...

 

 

भर मंडपात गोळ्या घालून हत्या, 'LIVE MURDER' सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2018 08:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...