शिवसंपर्क अभियानाला आमदारांनी दांडी मारली नव्हती, उद्धव ठाकरेंकडून पाठराखण

शिवसंपर्क अभियानाला आमदारांनी दांडी मारली नव्हती, उद्धव ठाकरेंकडून पाठराखण

शिवसंपर्क अभियानाला आमदारांनी दांडी मारली नव्हती असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दांडी बहाद्दर आमदारांची पाठराखण केलीये

  • Share this:

15 मे : शिवसंपर्क अभियानाला आमदारांनी दांडी मारली नव्हती असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दांडी बहाद्दर आमदारांची पाठराखण केलीये. अकोल्यात विदर्भातल्या शिवसंपर्क अभियानाच्या समारोपावेळी ते बोलत होते.

शिवसेनेनं मोठा गाजावाजा करत शिवसंपर्क अभियान हाती घेतलं होतं. पण मराठवाड्यातील तब्बल 27 आमदारांनी या अभियानाकडे पाठ फिरवली. शिवसंपर्क अभियानाकडे पाठ फिरवणाऱ्या आमदारांवर उद्धव ठाकरे कारवाई करतील अशी अपेक्षा होती मात्र त्यांनी आपल्या दांडी बहाद्दर शिलेदारांची पाठराखण केली. कोणत्याही आमदाराने दांडी मारलीच नाही असा खुलासाच उद्धव ठाकरेंनी केला. तसंच गौतम चाबुकस्वारांचं प्रकरण मीडियाने फुगवून दाखवलं अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेनेतला विसंवाद शिवसंपर्क अभियानात दांडी मारणाऱ्या आमदारांच्या निमित्तानं समोर आलं होतं. हा विसंवाद समोर आल्यानंतरही त्यावर पांघरुण घालण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 15, 2017 07:28 PM IST

ताज्या बातम्या