उद्धव ठाकरे विधान भवनात, 'युती'च्या बैठकीला काँग्रेसचा आमदार हजर

सध्या भाजप आणि शिवसेनेचं मिले सूर मेरा तुम्हाला चाललंय. तोच सूर विधान भवनातही बघायला मिळाला.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 05:56 PM IST

उद्धव ठाकरे विधान भवनात, 'युती'च्या बैठकीला काँग्रेसचा आमदार हजर

मुंबई 24 जून : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विधान भवनात आले. सध्या भाजप आणि शिवसेनेचं मिले सूर मेरा तुम्हाला चाललंय. तोच सूर विधान भवनातही बघायला मिळाला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनाही जोरदार तयारी करतेय. शिवसेनेच्या आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरेंची ही भेट होती. फक्त शिवसेनाच नाही तर भाजपचे मंत्री आणि आमदारांनीही त्यांचं स्वागत केलं. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: त्यांच्या भेटीला आले आणि आपल्या दालनात आग्रहाने घेऊन गेले.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी आणि आमदारांनी स्वागत केलं. त्याच बरोबर भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहीत यांनीही मुख्य प्रवेशद्वारावर उद्धव ठाकरे यांचे स्वागत केलं. त्यानंतर विधिमंडळ कामकाजमंत्री विनोद तावडे यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत केलं. त्याच वेळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही पुष्पगुच्छ देऊन उद्धव ठाकरे यांचे स्वागत केलं.

जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत करताच उपस्थित सर्वच आमदारांनी आश्चर्य व्यक्तं केलं. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्या दालनात उद्धव ठाकरे गेले. तिथे त्यांनी आमदारांसबोत चर्चा सुरू असतानाच  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व:ता येत उद्धव यांचं स्वागत केलं आणि त्यांनी आपल्या दालनात चर्चा करण्यासाठी आग्रहाने घेऊन गेले.

शिवसेना भाजपच्या बैठकी पूर्वीच दोन्ही पक्षातील दिलजमाई पाहून युती भक्कम असल्याचाच संदेश विरोधकानाही देण्यात आलांय. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांच्या बैठकीला बैठकीला काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हजर होते.

निलम गोऱ्हे बिनविरोध

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि अभ्यासू आमदार निलम गोऱ्हे यांची आज विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर बिनविरोध निवड झाली. या पदावर येणाऱ्या त्या पहिल्याच महिला नेत्या आहेत. निलम गोऱ्हे यांचं नाव कायम मंत्रिपदासाठी घेतलं जातं. मात्र त्यांना कायम या पदाने हुलकावणी दिलीय. मात्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर त्यांची निवड झाल्याने अनेक सदस्यांनी समाधान व्यक्त केलं. मंत्री दिवाकर रावते यांनी निलमताईंच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर सुभाष देसाई, महादेव जानकर यांच्यासह अनेक मंत्र्यांनी त्याला अनुमोदन दिलं.

काँग्रेसचे आमदार शरद रणपीसे यांनी रिपाई नेते जोगेंद्र कवाडे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. मात्र संख्या बळाचं गणित जमत नसल्याने त्यांच्या नावाचा प्रस्ताव मागे घेत असल्याचं रणपीसे यांनी सांगितलं. तर निवडणुकीमुळे कटूता येऊ नये असं वाटल्याने उमेदवारी मागे घेत असल्याचं कवाडे म्हणाले. गोऱ्हे यांनी फुले, आंबेडकरांच्या विचारांवर काम करावं, सेनेचा पुरोगामी चेहरा म्हणजे निलम गोऱ्हे आहेत. पहिल्यांदा महिला प्रतिनिधी उपसभापतीपदावर येत असल्याचा आनंदर आहे अशी भावनाही कवाडे यांनी व्यक्त केली.

तर निलम ताईंसारख्या अभ्यासू आमदार या पदावर येत असल्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा सभागृहाला फायदा होऊल असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 05:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close