उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 18 खासदारांसह कोल्हापूरच्या अंबाबाईचं घेणार दर्शन

Uddhav thackeray in Kolhapur tour : गुरूवारी उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 10:37 AM IST

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 18 खासदारांसह कोल्हापूरच्या अंबाबाईचं घेणार दर्शन

कोल्हापूर, संदीप राजगोळकर, 04 जून : लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या विजयानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहे. गुरूवारी उद्धव ठाकरे सहकुटुंब कोल्हापूर दौऱ्यावर जाणार असून त्यावेळी ते अंबाबाईचे दर्शन देखील घेणार आहेत. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत. गुरूवारी सकाळी दहा वाजता उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल होणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे 18 खासदार देखील अंबाबाईचं दर्शन घेतील.

कोल्हपुरातून फोडला होता प्रचाराचा नारळ

शिवसेना – भाजप युती झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीकरता प्रचाराचा नारळ हा कोल्हपुरातून फोडला होता. यावेळी त्यांनी अंबाबाईचं दर्शन देखील घेतलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे आता 18 खासदारांसह अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत.


विधानसभेच्या तोंडावर BJPची नवी रणनीती, पवारांचा कट्टर विरोधक पुण्याच्या पालकमंत्रिपदी?

Loading...

कोल्हापूरचा इतिहास

काँग्रेसचा गड म्हणून कोल्हापूरची ओळख. पण, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यावर कब्जा केला. 1952 मध्ये पहिल्यांदा इथे काँग्रेसचे रत्नाप्पा कुंभार निवडून आले. त्यानंतर दोन निवडणुका सोडल्या तर 1999 पर्यंत इथे काँग्रेसचंच वर्चस्व होतं.

2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा पराभव केला होता. तिसऱ्या स्थानावर शेतकरी कामगार पक्षाचे संपतराव पवार होते. पण, 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत कोल्हापूरमध्ये विजय मिळवला. संजय मंडलिक हे कोल्हापुरातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत.


तुमची मुलं सुरक्षित आहेत? एक वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचा CCTV VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 10:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...