News18 Lokmat

स्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य!

उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा रोख हा पूर्णपणे भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाच होता.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2018 10:28 PM IST

स्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य!

मुंबई, ता.18 ऑक्टोबर : शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला थेट लक्ष्य केलं. युती तुटताना जी घोषणा केली होती, त्याच घोषणेवर आम्ही आम्ही कायम आहोत. ती घोषणा काय होती हे शिवसैनिकांना समजलं असं सांगत त्यांनी भाजपशी जुळवून घेणार नाही हे स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा रोख हा पूर्णपणे भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाच होता. युती, दुष्काळ, हिंदुत्व, राम मंदिर, पाकिस्तान अशा अनेक विषयांवर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे...

युतीचं काय?

युती तुटत असतानाच मी एक घोषणा केली होती. आता किती वेळा तेच ते बोलायचं. ज्यांना ते समजलं त्यांना समजलं. शिवसैनिकांना ते समजलं. आता फक्त एकच काम करायचं आहे 2019 मध्ये महाराष्ट्रात भगवा फडकला पाहिजे. तीच शपथ सगळ्यांनी घ्यायची आहे. आम्ही अजुनही सत्तेत का? हा प्रश्न सगळे विचरतात. आमचं त्याला उत्तर आहे की आम्ही सत्तेचे बांधील नाही. सरकारमध्ये असलो तरी जे चुकतं त्याविरूद्ध बोलणारच. परिणामांची आम्हाला चिंता नाही.

राम मंदिर आणि हिंदुत्व

Loading...

शिवसेना भाजपसोबत आली ती हिंदुत्वाच्या मुद्यावर. पण भाजपनेच आता हिंदुत्वाचा मुद्दा सोडून दिला. सत्तेवर येताच त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला. राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा असताना गेली चार वर्ष त्याबाबत काहीही झालं नाही. राम मंदिर बांधा नाहीतर लोकांना खोटी आश्वासन देऊ नका.

भाजपला ही आठवण करून देण्यासाठीच मी 25 नोव्हेंबरला आयोध्येला जात आहे. अयोध्येत जावून पंतप्रधान मोदींना मी प्रश्न विचारणार आहे. राम मंदिर तुम्ही बांधता की आम्ही बांधू ते फक्त सांगा. शिवसेना मंदिर बांधायला केव्हाही तयार आहे.

दळभद्री सरकार

देशाचा राज्यकारभार अतिशय वाईट पद्धतीने सुरू आहे. महागाई वाढलीय. महिला असुरक्षित नाहीत. सीमेवर शांतता नाही काश्मीरमध्ये रोज हिंसाचार होतोय. या सरकारला पाकिस्तानविषयी काहीही धोरण नाही. सत्तेत येण्याआधी फक्त घोषणा करतात. गेली चार वर्ष झाली 370 वं कलम रद्द केलं नाही. हे कलम रद्द करणारा ठराव संसदेत आणा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ.

दुष्काळा जाहीर करा

सरकार फक्त सरकारी कामकाज करतय. दुष्काळाने लोक होरपळत आहेत. कर्नाटकाने दुष्काळ जाहीर केला मात्र महाराष्ट्र सरकार टाळाटाळ करतेय. कसले सर्व्हे आणि समित्या नेमुन अभ्यास करताय. थेट दुष्काळ जाहीर करा. महाराष्ट्र सरकारनं तातडीनं दुष्काळ जाहीर केला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल.

फक्त हिंदुंच्या सणांवरच बंदी का?

गणेशोत्सव आणि इतर सणांमध्ये अनेक गोष्टींवर बंदी घातली जात आहे. मात्र इतर धर्मांच्या सण आणि उत्सवांवर अशी बंदी का येत नाही. रमझानच्या काळात शस्त्रसंधी जाहीर करता. मग नवरात्री आणि इतर सणांमध्ये असे निर्णय घेण्याची हिंम्मत सरकार दाखवणार का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

VIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 18, 2018 10:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...