कर्जमुक्ती द्या,सत्तेतून बाहेर पडून पाठिंबा देऊ -उद्धव ठाकरे

"मध्यावधीसाठी चाचपणी काय करताय, शेतकरी कर्जमुक्त करा, माझे सर्व मंत्री सत्ता सोडून बाहेर पडून तुम्हाला सत्तेसाठी पाठिंबा देतील"

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 19, 2017 04:30 PM IST

कर्जमुक्ती द्या,सत्तेतून बाहेर पडून पाठिंबा देऊ -उद्धव ठाकरे

19 मे : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली तर सत्ता तुमचीच, सरकार पडू देणार नाही अशी घोषणावजा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलाय. ते नाशकात शिवसेनेच्या मी कर्जमुक्त होणारच मेळाव्यात बोलत होते. विशेष म्हणजे ह्याच मेळाव्यात भाजपच्यासोबत सरकारमध्ये असलेले राजू शेट्टीही हजर होते.

नाशिकमध्ये शिवसेनेचा 'मी कर्जमुक्त होणाराच' मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.

'साले म्हणाऱ्यांची साले काढतील'

रावसाहेब दानवे यांचे विधान ऐकून तळ पायाची आग मस्तकात गेली, आता शेतकरी शांत बसणार नाही. साले म्हणाऱ्यांची साले काढतील अशी टीका उद्धव ठाकरे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केली.

'सत्तेतून बाहेर पडुन पाठिंबा देऊ'

Loading...

मध्यावधीसाठी चाचपणी काय करताय, शेतकरी कर्जमुक्त करा, माझे सर्व मंत्री सत्ता सोडून बाहेर पडून तुम्हाला सत्तेसाठी पाठिंबा देतील असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी दिलं. तसंच सत्तेला लाथ मारायला मला एका क्षणाचाही विलंब लागणार नाही. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी साथ आहे, सोबत आहे. ती मी तुम्हांला देईन अशी ग्वाहीही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.

'आता शेतकऱ्यांची बात'

सरकारने तूर घोटळा केला आहे. तुरीचे बम्पर पीक येणार माहीत असतांना तूर आयात केली असा आरोप करत आता खूप झाली मन की बात,आता शेतकरीच बात करतील असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

'समृद्ध मार्गासाठी शेतकऱ्यांच्या समृद्धीवर वरवंटा फिरवून नका'

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारे आम्ही कपाळकरंटे नाही. कर्जमाफी तात्पुरता इलाज असेल, पण तात्पुरता तरी इलाज करा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्याच अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली. तसंच समृद्ध मार्गासाठी शेतकऱ्यांच्या समृद्धीवर वरवंटा फिरवून नका. विदेशातून काळा पैसे आणून देणार होते त्याचे काय झाले, ते आणून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा असा सल्लाही ठाकरेंनी दिला.

'मुख्यमंत्री अभ्यासू विद्यार्थी'

सत्तेत असतानाही विरोध केला की प्रश्न विचारतात की सत्तेत असून विरोध कसा, पण आमची बांधिलकी समाज आणि शेतकऱ्यांशी आहे. मुख्यमंत्री फडणवीस जेव्हा विरोधात असताना कर्ज माफी मागायचे आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यांत रूपांतर झाले असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

तर राजू शेट्टी यांनी फडणवीस सरकारचा खरपूस समाचार यावेळी घेतला.  वाल्याचा वाल्मिकी करण्यापेक्षा कर्जमुक्ती करा अशी मागणी शेट्टींनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2017 04:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...