News18 Lokmat

शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाबद्दल सरकार जबाबदार-उद्धव ठाकरे

News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2019 06:44 AM IST

शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाबद्दल सरकार जबाबदार-उद्धव ठाकरे

मुंबई, 8 एप्रिल : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून शेतकरी प्रश्नांसंदर्भात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'या वर्षी पावसाने आधीच दगा दिला, तरीही शेतकऱ्याने कसेबसे पीक वाढवले. आता ते पीकही हातचे गेले, पण शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करायला सरकार जागेवर नाही. सरकारी यंत्रणा देशाच्या शक्तिशाली वगैरे लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणुकीच्या मैदानात आहे व शक्तिशाली शेतकरी साफ कोलमडून पडला आहे. ना सरकार, ना विरोधी पक्ष, ना प्रशासन! शेतकऱ्याने फिर्याद मांडायची कोणाकडे?'अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजप तोफ डागली आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

- गरीब आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सगळ्याच राजकीय पक्षांना पान्हा फुटला आहे. लोकसभा निवडणुकांतील प्रचार सभांतून आपणच कसे शेतकऱ्यांचे ‘मायबाप’ आहोत हे सिद्ध करण्याची चढाओढ सुरू आहे. जणू सगळ्याच लांडग्यांच्या अंगात हत्तीचा संचार झाला आहे. एखादा मोठा हत्ती पिसाळल्यावर ज्याप्रमाणे तो वाटेल तशी धुळधाण करीत सुटतो तशी आमच्याकडील सर्वपक्षीय राजकारण्यांची स्थिती झाली आहे.

- मराठवाडय़ातील अनेक भागांत अवकाळी पाऊस व गारा पडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तेथील बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्हय़ांना त्याचा फटका बसला. आंबा आणि द्राक्ष या दोन्ही पिकांचे नुकसान झाले. विदर्भातही काही ठिकाणी हेच वादळवारे सुटले व शेतातील पिकांचे नुकसान झाले. पंढरपूर व आसपासच्या परिसरात पाऊस पडला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.  या वर्षी पावसाने आधीच दगा दिला, तरीही शेतकऱ्याने कसेबसे पीक वाढवले. आता ते पीकही हातचे गेले, पण शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करायला सरकार जागेवर नाही.

- सरकारी यंत्रणा देशाच्या शक्तिशाली वगैरे लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणुकीच्या मैदानात आहे व शक्तिशाली शेतकरी साफ कोलमडून पडला आहे. ना सरकार, ना विरोधी पक्ष, ना प्रशासन! शेतकऱ्याने फिर्याद मांडायची कोणाकडे?

Loading...

वाचा अन्य बातम्या

बिर्याणीवरून आधी वाद..नंतर हाणामारी, काँग्रेस कार्यकर्त्यांचा VIDEO समोर

VIDEO : गोपनाथ मुंडेंचा राजकीय वारसा, धनंजय आणि पंकजा आमने-सामने

VIDEO : 'निवडणुका आल्या की मोदी अंगात आल्यासारखं करतात'

- दुष्काळ किंवा संकटाच्या वेळी किमान ‘निर्वाह चालविता’ येण्याइतकी शिल्लक शेतकऱ्यांपाशी का नसावी? अशा अवकाळी संकटाशी टक्कर देण्याइतपत सामर्थ्य आमच्या शेतकऱ्यांकडे का नसावे? आज तो आत्महत्या करतोय किंवा घरदार,    गाव, जमीन सोडून निर्वासित होतोय. महाराष्ट्राच्या अनेक गावांतील स्थिती अशी आहे की, तेथील सरपंच रोजगार हमीवर मजुरी करीत आहेत.

- ‘शेतकरी हा राजा’ असे म्हणायला वगैरे ठीक आहे, पण तोच शेतकरी आज गुलामीपेक्षा खालचे जिणे जगण्यास मजबूर का झाला? याचे खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडून काय उपयोग? पंतप्रधान मोदी यांचे म्हणणे असे की, ‘‘शेतकऱ्यांच्या सध्याच्या गरिबीस काँगेस पक्षच जबाबदार आहे. काँग्रेसला हटवा गरिबी आपोआपच दूर होईल.’’ मोदी यांचे म्हणणे योग्य आहे, पण काँग्रेस 2014 सालीच हटली आहे.

- काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे, असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही. काँग्रेस 1978 साली जनता पक्षाच्या काळात हटलीच होती, काँग्रेस व्ही.पी. सिंगांच्या काळातही नव्हती, अटलबिहारींच्या काळातही काँगेस सत्तेवरून दूर गेली होती आणि 2014 सालानंतर तर हा पक्ष नामशेषच झाला.

- लोकसभेत पन्नासचे बळही त्यांच्यापाशी उरले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दैन्यास ते एकटे जबाबदार नाहीत. शेतकरी कर्जबाजारी झाला हे नक्की, पण शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाबद्दल ‘सावकार’ लोक जबाबदार नसून सरकार त्याला जबाबदार आहे

- शेतकरी टाचा घासून सरणावर पोहोचला तरी त्याचे कर्ज फिटत नाही, शेतमालाच्या रास्त किमतीचा मूलभूत प्रश्न सुटत नाही आणि ही साखळी तुटत नाही. ती तुटेल या आशेने 2014 मध्ये शेतकऱ्यांनी विद्यमान सरकारला मतदान केले. सरकारने त्यादृष्टीने काही निर्णयही घेतले. तरी साखळी तुटत नाही तोपर्यंत शेतकरी कर्जमुक्त आणि संकटमुक्त होणार नाही.

- निसर्गावर आपले नियंत्रण नाही हे मान्य केले तरी त्यातून मार्ग काढून संकटग्रस्त बळीराजाला भक्कम आधार आणि सर्वप्रकारचे पाठबळ देण्याचे काम सरकारचेच असते. ते जोरकसपणे व्हावे इतकीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 06:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...