Elec-widget

उद्धव ठाकरेंची पुन्हा अयोध्यावारी.. शिवसेनेच्या खासदारांसोबत राम लल्लाचे दर्शन घेणार

उद्धव ठाकरेंची पुन्हा अयोध्यावारी.. शिवसेनेच्या खासदारांसोबत राम लल्लाचे दर्शन घेणार

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार येत्या 15 जूनला अयोध्येत जाणार आहेत. अयोध्येत जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 5 जून- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार येत्या 15 जूनला अयोध्येत जाणार आहेत. अयोध्येत जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. आता शिवसेना पक्षप्रमुख 15 जूनला अयोध्येत शिवसेना सर्व विजयी खासदारांसह राम लल्लाचं दर्शन घेणार आहे. पुन्हा एकदा राम मंदिर प्रश्न धसास लावण्यासाठी शंख फुंकणार असल्याचे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रचंड यश मिळविले. 18 जागांवर शिवसेनेचे उमेदवार दणदणीत आणि खणखणीत मताधिक्याने विजयी झाले. या 18 खासदारांसह उद्धव ठाकरे यांनी एकवीरा आईचे अगदी मनोभावे दर्शन घेतले.

लोकसभा निवडणुकीत भगवा फडकवणाऱ्या शिवसेनेच्या 18 खासदारांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब एकविरा देवीचे दर्शन घेतले होते. कार्ला गडावर उद्धव ठाकरे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. शिवसेना आणि भाजपा युतीला लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाले आहे. राज्यातल्या जनतेने शिवसेनेचे 18 खासदार निवडून दिले. यावेळी शिवसेना खासदार राहुल शेवाळे, राजेंद्र गावित, खासदार भावना गवळी, धैर्यशील माने, गजानन कीर्तिकर, श्रीरंग बारणे, विनायक राऊत, सदाशिव लोखंडे, अनिल देसाई, राजन विचारे, श्रीकांत शिंदे यांच्यासह सर्व विजयी खासदार तसेच शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेची पुढील वाटचाल चांगली राहावी आणि भरघोस यश मिळावे, लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपा युतीला भरघोस यश मिळू दे, असे साकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकवीरा मातेला घातले होते.


Loading...

शौचालयाच्या टाईल्सवर महात्मा गांधींचा फोटो, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2019 07:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...