नोटबंदीसारखं राम मंदिर का होऊ शकत नाही? -उद्धव ठाकरे

राम मंदिर, समान नागरी कायदा, 370 कलम रद्द करणे या सगळ्या गोष्टी आतापर्यंत का नाही झाल्या? असा सवाल त्यांनी केला.

News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2018 06:00 PM IST

नोटबंदीसारखं राम मंदिर का होऊ शकत नाही? -उद्धव ठाकरे

पुणे, 14 जुलै : नोटबंदी एक क्षणात झाली तसं राम मंदिर का नाही होऊ शकत? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थितीत केलाय. तसंच नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे होणार नाही हे स्पष्ट आहे असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक पुण्यात पार पडली.

या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मुंबईतील खड्डे, नाणारचा प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प आणि महाविद्यालयात भगवदगीता वाटप या विषयांवर भाष्य केलं.

2019च्या निवडणूकीपूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करू - अमित शहा

जे वाटप करतायत ती भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे का गुजराती ? यापेक्षा विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण द्या, वेळेवर परीक्षा घ्या,निकाल लावा,पेपर फुटी नको हे सगळं झाकण्यासाठी भगवदगीतेचा विषय काढण्यात आला का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

राज्यसभा सदस्यपदी आता सचिन आणि रेखा नाहीत; या चार जणांची नियुक्ती!

Loading...

राम मंदिर, समान नागरी कायदा, 370 कलम रद्द करणे या सगळ्या गोष्टी आतापर्यंत का नाही झाल्या? असा सवाल त्यांनी केला. शिवाय नोटाबंदी एक क्षणात झाली, तसे राम मंदिर का होऊ शकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

5 वर्ष भांडतोय पण निवडणुकीत एकत्र येऊ किंवा नाही हे माहीत नाही. मुळात हा निर्णय 1 जण नाही अनेक जण घेतात असं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला.

ट्विटरच्या 'या' निर्णयामुळे मोदींपासून ते बराक ओबामापर्यंत सगळ्याचे फॉलोअर्स झाले कमी

खड्डे पडतायत पण जबाबदारी फक्त पालिकेची नाही सर्वांची आहे आणि सरकारची पण आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प लादणार नाही, असं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे काहीही झालं तरी नाणार प्रकल्प होऊ देणार नाही या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2018 06:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...