शरद पवारांसोबतच्या मॅरेथॉन बैठकीनंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया

बैठकीसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे हे मुंबईत दाखल झाले. आता ही बैठक संपल्यानंतर उदनराजेंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 9, 2019 01:09 PM IST

शरद पवारांसोबतच्या मॅरेथॉन बैठकीनंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 9 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे हे मुंबईत दाखल झाले. आता ही बैठक संपल्यानंतर उदनराजेंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'एकदिलाने काम करण्यास सर्वांची अनुमती आहे. येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन जायला तयार आहे,' असं उदयनराजे बैठकीनंतर म्हणाले आहेत.

दरम्यान, सातारा मतदारसंघातून पुन्हा एकदा उदयनराजे यांच्या उमेदवारी देण्यावरून राष्ट्रवादीत कलह आहे. पक्षातील वाद निवडणुकीत डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. तसंच माढा लोकसभा मतदारसंघामध्येही सातारा जिल्ह्यातील तीन विधानसभा येतात. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती.

उदयनराजेंची उमेदवारी आणि वाद

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील या दोन राजेंमध्ये काही दिवसांपूर्वी मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतर आमच्यात मनोमिलन होण्याचा प्रश्नच नाही, असं म्हणत शिवेंद्रराजेंनी आपण अजूनही उदयनराजेंवर नाराज असल्याचं स्पष्ट केलं होतं. या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे आणि नरेंद्र पाटील यांच्यातील भेटीने उदयनराजेंच्या अडचणी वाढतात का, हे पाहावं लागेल.

Loading...

दरम्यान, युतीच्या घोषणेनंतर आता सातारा लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथं उदयनराजे विरुद्ध नरेंद्र पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

2014 ला सेनेकडून RPI आठवले गटाला सातारा लोकसभा मतदारसंघ सोडला होता. पण आता RPI भाजपच्या गोटात आहे. आणि भाजपने अद्यापपर्यंत आरपीआयला एकही जागा सोडलेली नाही. त्यामुळे या मतदारसंघावर आता भाजप स्वत:चाच उमेदवार देण्याची शक्यता आहे.

भाजपकडून या मतदारसंघासाठी चर्चेत असणारे नरेंद्र पाटील हे सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर अध्यक्ष आहेत. ते जर उदयनराजेंविरोधात उभे राहिले तर या मतदारसंघात चांगली लढत होईल, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.


उंदराने चोरले कोट्यवधींचे हिरे, CCTV VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2019 01:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...