खासदार उदयनराजेंचे आता विश्वास नांगरे पाटील टीमलाच आवाहन

तुम्ही बिचाऱ्या "सुसंस्कृत पोरांचे" हट्ट ऐकत नाहीत. मग काय करायचं हे पाहिलं जाईल

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2018 10:24 AM IST

खासदार उदयनराजेंचे आता विश्वास नांगरे पाटील टीमलाच आवाहन

सातारा, ११ सप्टेंबर- विविध कारणांवरून सातत्याने चर्चेत असणाऱ्या खासदार उदयनराजेंनी आता पोलिसांना खुलं आवाहन दिल आहे. गणपती उत्सवादरम्यान डिजे लावणार असल्याचं म्हणत, कायद्यालाच त्यांनी थेट आवाहन दिलंय. साताऱ्यातील एका गणपती आगमन समारंभात त्यांनी कायद्याची चौकट न बाळगता डीजे लावण्याचा संदेशच त्यांनी कार्यकर्त्य़ांना दिलाय. जब तक है जान तब तक डॉल्बी रहेगी, म्हणत त्यांनी आपण गणपतीचे खरे भक्त असल्याचं ही म्हटलं या खुल्य़ा आवाहनावर पोलिस नेमकी काय भुमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय.

डीजे लावणारच असं सांगून पुन्हा कायद्याला आव्हान देण्याचं काम सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रात्री साताऱ्यात दिले. सातारा शहरातील एका गणपती आगमनावेळी ते स्टेजवर बोलत होते. बोलताना त्यांनी कायद्याची चौकट न पाळ्याचा कार्यकर्तांनाजणू संदेशच दिला. उदयनराजेंच्या या भाषणावर आता पोलिस खाते नेमकी काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान सर्वांनी न्यायालय आणि पोलिसांच्या आदेशाचे पालन करुन कायदयाचा आदर करावा कुठेही डॉल्बी लावू देणार नाही अशी तंबी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.

उदयनराजेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

२३ तारखेला विसर्जन आहे तेव्हा पाहू काय होतं आणि काय नाही होतं आणि कसं नाही होत. डॉल्बी लागलीच पाहिजेत, डेसीमल ठरवणारे कोर्ट आणि पोलिस डिपार्टमेंट कोण? डेसीमल ठरवतात तुमच्या आमच्यासारखे अवली लोक.

खऱ्या अर्थाने आम्ही गणपतीचे भक्त आहोत. गणपतीला त्रास होत नाही तर इतरांना त्रास व्हायचं काही कारणच नाही. त्रास तरीही झालाच तर एक दोन दिवस सहन करायला काही जात नाही.

मोठ्या आवाजाने बिल्डींग पडतात.. हे पडतं... ते पडतं... या साऱ्या गोष्टी खोट्या आहेत. उलट जुन्या इमारती पाडण्यासाठी याचा वापर करा. जुन्या इमारतींची डागडुजी करत नाहीत. मात्र

तुम्ही बिचाऱ्या "सुसंस्कृत पोरांचे" हट्ट ऐकत नाहीत. मग काय करायचं हे पाहिलं जाईल.

ही धमकी नाही तर ही मी समज देतोय, प्लॅन करा नाहीतर तुम्ही कोणत्याही कोर्टात जावा डॉल्बी तर असणारच आहे. जब तक है जान तब तक डॉल्बी रहेगी... जब तक डॉल्बी रहेगी तब तक गणपती रहेगा. एवढंच सांगतो आता बोलायची वेळ नाही.

VIDEO : अन् काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या 'नरेंद्र मोदी झिंदाबाद'च्या घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2018 10:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close