S M L

उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल,अटक की शरण ?

उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर पहिल्यांदाच उदयनराजे साताऱ्यात दाखल झाले आहे

Sachin Salve | Updated On: Jul 21, 2017 10:39 PM IST

उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल,अटक की शरण ?

21 जुलै : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल झाले आहे.  उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर पहिल्यांदाच उदयनराजे साताऱ्यात दाखल झाले आहे. त्यामुळे त्यांना आता अटक होणार का याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे. याप्रकरणी दोनच दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. अटकेच्या कारवाईमुळे उदयनराजे गेल्या काही दिवसांपासून फरार होते. आज रात्री उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल झाले आहे. त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलंय. पण आता उदयनराजे स्वत: पोलिसांना शरण जातात की त्यांना अटक होते हे पाहण्याचं ठरणार आहे.

काय आहे प्रकरण?

साताऱ्यातल्या लोणंदमधे सोना अलाईज नावाची एक कंपनी आहे. या कंपनीत उदयराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली असलेली एक माथाडी कामगार संघटना आहे. तर दुसऱ्या संघटनेचे नेतृत्त्व रामराजे निंबाळकर करतात. ही कंपनी रामराजे निंबाळकर यांच्या कामगार संघटनेला झुकते माप देते असा आरोप उदयनराजे यांनी केला.

त्यानंतर 18 फेब्रुवारीला उदयनराजेंनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घेतलं. तेथे पोहोचल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकुमार जैन यांना मारहाण केली आणि काही ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिली त्यानंतर उदयनराजे आणि सहकाऱ्यांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2017 10:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close