वाढदिवसाच्यानिमित्ताने उदयनराजेंचं शक्तिप्रदर्शन

सर्वच नेत्यांनी उदयराजेंची तोंडभरून स्तुती केली. तर प्रत्युत्तराच्या भाषणात उदयनराजे शरद पवारांचं नाव घेताच गहिवरले. कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढल्यानं त्यांना पुन्हा गहिवरून आलं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 24, 2018 10:15 PM IST

वाढदिवसाच्यानिमित्ताने उदयनराजेंचं शक्तिप्रदर्शन

सातार 24 फेब्रुवारी : अलोट गर्दी, अमाप उत्साह आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा 51 वा वाढदिवस साताऱ्यात आज जल्लोषात साजरा झाला.

सातारा जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर झालेल्या भव्य कार्यक्रमात वाढदिवसाचं निमित्त साधून उदयनराजेंनी शक्तीप्रदर्शन केलं आणि 2019 च्या निवडणुकीत आपल्याशिवाय पर्याय नसल्याचं दाखवून दिलं.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,पुण्याचे पालकमंत्री गिरिष बापट, सेनेचे मंत्री विजय शिवतारे यांच्यासह राज्यातले अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

सर्वच नेत्यांनी उदयराजेंची तोंडभरून स्तुती केली. तर प्रत्युत्तराच्या भाषणात उदयनराजे शरद पवारांचं नाव घेताच गहिवरले. कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढल्यानं त्यांना पुन्हा गहिवरून आलं. लोकांच प्रेम असेपर्यंत लोकांसाठी काम करत राहू असं उदयराजे म्हणाले. सर्वपक्षीय नते उपस्थित असतानाच जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र कार्यक्रमावर अंतर्गत राजकारणामुळे बहिष्कार घातला होता.

असं केलं नेत्यांनी उदयनराजेंच कौतुक

उदयनराजे हे मुक्तविद्यापीठ : मुख्यमंत्री

उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी ते मुक्तविद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाचे नियम तेच करतात आणि कुणी नियम मोडला तर त्याला शिक्षाही तेच देतात. उदयनराजेंना पक्षाची चौकट नाही ते मोठे नेते आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले.

सर्व मागण्या मान्य

अजिंक्य तारा किल्ल्याच्या विकासासाठी 25 कोटी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केली. साताऱ्यात मेडिकल कॉलेजला जागा देण्यात येईल असंही ते म्हणाले.

- कास धरणाची उंची वाढवणं

- भूयारी गटारी योजाना

- वाहतूकीची कोंडी फोडण्यासाठी ग्रेड सेपरेटर

या तीन योजनांचं भूमिपूरजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.

उदयनराजे हे रयतेचे राजे : शरद पवार

छत्रपतींचे वंशज असल्याने उदयनराजेंबद्दल दिल्लीत कमालीची उत्सुकता असते. उदयनराजे हे जनतेची अखंड कामं करत असतात. मात्र ते त्याची जाहीरात करत नाही. ते रयतेची चिंता करतात त्यामुळे ते रयतेचे  राजे अजूनही ते विनम्र आहेत असं कौतुक शरद पवारांनी केलं.

राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता : पृथ्वीराज चव्हाण

उदयनराजे यांच्याकडे राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. ते पक्षाच्या चौकटीत अडकणारे नेते नाहीत. त्यांच्यामुळे कधी वाद निर्माण होतात पण त्याचं त्यांचा वयक्तिक स्वार्थ नसतो.

राजे WE LOVE YOU...

उदयनराजे भाषण करत असताना कार्यकर्त्यांचा जल्लोष टिपेला पोहोचला. त्यातच प्रेक्षकांमधून आवाज आला राजे  WE LOVE YOU...या वाक्यावर उदयनराजे हसले आणि म्हणाले, "हे कुणी मुलींनी म्हटलं असतं तर समजून घेता आलं असतं. बरं झालं मुलींनी म्हटलं नाही, नाहीतर सोडचिढ्ढीच झाली असती असं म्हटल्यावर तरूणांनी अवघं मैदान डोक्यावर घेतलं."

क्षणचित्र....

सातारा जि.प. शाळेच्या मैदानावर भव्य व्यासपीठ तयार करण्यात आलं होतं. मैदान गर्दींनं खच्चून भरलेलं होतं. त्यात लक्षणीय उपस्थिती होती ती तरूणांची..व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी होती. सर्वच नेत्यांच्या स्वागतासाठी प्रचंड मोठा हार आणण्यात आला होता. 51 व्या वाढदिवसानिमित्त 51 किलोंचा किलोंचा केक आणण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2018 10:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close