S M L

राजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले

बलात्काराच्या घटना वाढत आहेत, याचं कारण तुम्ही मान्य केलेली लोकशाही आहे. राजेशाही असती तर बलात्कार करणाऱ्याला गोळ्या घातल्या असत्या. आता एकच करा, पुन्हा राजेशाही आणा, मग मी दाखवतो काय करायचं, अशाप्रकारे आपला राग त्यांनी व्यक्त केला.

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 24, 2018 10:50 AM IST

राजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले

सातारा,20 एप्रिल:  साताऱ्याचे खासदार   आणि  शिवरायांचे थेट तेरावे वंशज  उदयनराजे भोसले यांनी कठुआ, उन्नाव बलात्कार प्रकरणावर    आता मत व्यक्त केलं आहे. राजेशाही असती तर   बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असत्या अशा शब्दात  त्यांनी आपला राग  व्यक्त  केला. उदयनराजे भोसले जिल्हा परषदेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या वेळी बोलत होते.

बलात्काराच्या घटना वाढत आहेत, याचं कारण तुम्ही मान्य केलेली लोकशाही आहे. राजेशाही असती तर बलात्कार करणाऱ्याला गोळ्या घातल्या असत्या. आता एकच करा, पुन्हा राजेशाही आणा, मग मी दाखवतो काय करायचं, अशाप्रकारे आपला राग त्यांनी व्यक्त केला.

तुम्ही जनतेने निवडून दिलेले सदस्य, लोकप्रतिनिधी जर तुमचे प्रश्न मार्गी लावत नसतील तर काय उपयोग. आरोग्य विभागतील मशिनरी कर्मचारी नाहीत म्हणून सडून गेल्या आहेत..ही वस्तुस्थिती असून, आज बलात्काराच्या घटना वाढत आहेत, याचं कारण तुम्ही मान्य केलेली लोकशाही आहे..राजेशाही असती तर बलात्कार करणाऱ्याला गोळ्या घातल्या असत्या. आता एकच करा, पुन्हा राजेशाही आणा, मग मी दाखवतो काय करायचे..असं विधान खासदार उदयनराजे भोसलेंनी केलं

कठुआच्या बलात्काऱ्यांना  शिक्षा व्हावी म्हणून जगभरातून  प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.  त्यातच आता उदयनराजेंनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2018 06:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close