मद्यधुंद अवस्थेतल्या दोन तरुणांचा दरीत पडून मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

प्रताप राठोड, इम्रान गारदी अशी त्यांची नावं आहेत. मद्यधुंद अवस्थेत ते दोघे कड्याच्या टोकावर उभे राहून हुल्लडबाजी करत असताना त्यांचा तोल गेला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2017 10:45 AM IST

मद्यधुंद अवस्थेतल्या दोन तरुणांचा दरीत पडून मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

03 आॅगस्ट : 31 जुलैला संध्याकाळी आंबोलीतील कावळेसाद पॉईंटवर दोन तरुणांचा खोल दरीत पडून मृत्यू झालाय. प्रताप राठोड, इम्रान गारदी अशी त्यांची नावं आहेत. मद्यधुंद अवस्थेत ते दोघे कड्याच्या टोकावर उभे राहून हुल्लडबाजी करत असताना त्यांचा तोल गेला. आणि ते खोल दरीत कोसळले. दाट धुक्यामुळे त्यांचा थांगपत्ता  लागेना. अखेर त्यांच्या सहकाऱ्यांनी आंबोली पोलीस गाठलं.

दूरक्षेत्र जीवरक्षक बाबल आल्मेडा आणि पोलीस पोहोचले घटनास्थळी पोचून शोधकार्य सुरू केलं. क्रेन मागवण्यात आली. त्यांचे मृतदेह जिथं आहेत,त्याठिकाणी पोहोचणं कठीण आहे. त्यामुळे त्यांचे मृतदेह काढणं कठीण आहे. त्यांचा हुल्लडबाजी करण्याचा व्हिडिओ समोर आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2017 09:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...