Elec-widget

ट्रकच्या धडकेत दोन महिला ठार, कामावरून घरी जाताना काळाचा घाला

ट्रकच्या धडकेत दोन महिला ठार, कामावरून घरी जाताना काळाचा घाला

टिप्परच्या धडकेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत दोन्ही महिला खाण कामगार होत्या. कामावरून सुटी झाल्यानंतर त्या घरी जात होत्या. सुनिता चौधरी (वय-44) व वंदना सोनेकर (वय-31) अशी मृत महिलांची नावे आहेत.

  • Share this:

भंडारा, 27 जून- टिप्परच्या धडकेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत दोन्ही महिला खाण कामगार होत्या. कामावरून सुटी झाल्यानंतर त्या घरी जात होत्या. सुनिता चौधरी (वय-44) व वंदना सोनेकर (वय-31) अशी मृत महिलांची नावे आहेत.

मिळालेली माहिती अशी की, भंडारा जिल्ह्यात मॅग्निज इंडिया लिमिटेड खाण आहे. या खाणीत महिला कामाला होत्या. कामावरुन सुटी झाल्यानंतर त्या घरी परत जात असताना खाणमधील पाण्याच्या ट्रकने दोन्ही महिलांना मागून जोरदार धडक दिली. दोन्ही महिला ट्रकच्या चाकात येऊन त्या चिरडल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

जीप-ट्रकच्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू

चाकण-शिक्रापूर महामार्गावर बुधवारी रात्री जीप आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. वल्लभ रावत, संजय वाल्मिक अशी मृतांची नावे आहेत तर दीपक गणपत गोसावी हे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

शिक्रापूर येथून रिलायन्स भास्कर रिसर्च कंपनीतून साहित्य घेऊन पनवेल येथे घेऊन जात असताना चाकण-शिक्रापुर रोडवर भोसे येथे जीप व कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. जीपमध्ये बसलेल्या दोघांचा जागीच मृत्यू तर चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

Loading...

जीपमध्ये केमिकल वर्धकमाल होता. स्फोटके सदृश्य वस्तु होत्या. त्यातील एक वस्तु गायब असल्याची माहिती समोर आली आहे. कुठलीही सुरक्षा न घेता महामार्गावरुन अशा पद्धतीने स्फोटकांची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.

VIDEO: अमानुषतेचा कळस! अर्धनग्न करत तरुणाला बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2019 04:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...