News18 Lokmat

निवडणुकीचे काम आटोपून घरी परतरणाऱ्या शिक्षकांवर काळाचा घाला, दोघांचा जागीच मृत्यू

निवडणुकीचे काम आटोपून घरी येत असताना शिक्षकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 01:33 PM IST

निवडणुकीचे काम आटोपून घरी परतरणाऱ्या शिक्षकांवर काळाचा घाला, दोघांचा जागीच मृत्यू

नागपूर, हर्षल महाजन, 12 एप्रिल : निवडणुकीचे काम आटोपून घरी परतत असताना शिक्षकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. यात दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी (12 एप्रिल) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास नागपूर-उमरेड मार्गावर चांपाजवळ ही दुर्घटना घडली.अशोक विद्यालयाचे मेंढुले आणि बहे या शिक्षकांचा अपघातात मृत्यू झाला आहे.  यात खैरी बुटीचे मुख्याध्यापक बोहरुपी आणि सिल्लीचे नरेंद्र पिपरे हे दोन शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत.

रामटेक लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला झालेल्या मतदानाच्या कामकाजासाठी उमरेड विधानसभा क्षेत्रात कर्तव्य बजावण्यासाठी शिक्षक गेले होते. मतदानानंतर ईव्हीएम स्ट्रॉंगरूममध्ये जमा करून हे सर्व शिक्षक घराकडे परतत होते. त्यावेळेस काळानं त्यांच्यावर घाला घातला.

वाचा अन्य बातम्या

VIDEO: सुजय विखे यांच्या रूपानं काँग्रेस-राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक - मुख्यमंत्री

VIDEO: 'शरद पवारांनी राजू शेट्टींना ये-ये म्हणत पिंजऱ्यात घेतलं'

Loading...

VIDEO: 'हा उसाला लागलेला कोल्हा', सदाभाऊ खोतांची शेट्टींवर जहरी टीका

राज ठाकरे नांदेडमध्ये दाखल, रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 12:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...