S M L

घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी साखरेचे दोन दर

वेगवेगळ्या दरांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याचं सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी सांगितलंय.

Sachin Salve | Updated On: Apr 11, 2017 06:38 PM IST

घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी साखरेचे दोन दर

11 एप्रिल : साखरेचे घरगुती आणि व्यावसायिक असे दोन वेगवेगळे दर ठेवण्याचा सरकारचा विचार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिलीये. वेगवेगळ्या दरांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याचं   सुभाष देशमुखांनी सांगितलंय.

व्यायसायिक आणि घरघुती वीज वापराचे दर ज्याप्रमाणे वेगवेगळे असतात त्याचप्रमाणे आता साखरेबाबतही धोरण आखले जात असल्याचे सुतोवाच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलंय. व्यावसायासाठी आणि घरघुती वापरासाठी लागणाऱ्या साखरेच्या दरात आता बदल असणार आहेत. याबाबत लवकरच समिती गठित करुन त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलीय. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली शेतकरी संघटनेची मागणी आता प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे निर्माण झालीयत.

शेतकरी कर्जमाफीवरुन राज्यभरात रणकंदन सुरू असतानाच आता सहकारमंत्र्यांनीही त्यात उडी घेतलीय. २००९ साली झालेल्या कर्जमाफीचा फायदा नक्की किती शेतकऱ्यांना झाला याचे सर्वेक्षण करुनच कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल स्पष्ट मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलंय.

ज्या तूर उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नसतील त्यांना येत्या आठवडाभरात पैसे मिळतील असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलंय.

तूरदाळ खरेदी केल्यानंतर तीन दिवसात पैसे देणे बंधनकारक असताना व्यापाऱ्यांकडून पैसे देण्याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येतेय याबाबत सहकारमंत्र्यांना विचारले असता त्यांनी हे आश्वासन दिलेय. त्यामुळे आतातरी तूर उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा मोबदला मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 06:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close