नववीच्या विद्यार्थ्यांनी जिवे मारण्याची धमकी देत मित्राकडून हडपले 3 लाख रुपये

नवी मुंबईतील एक शाळेतील धक्कादायक घटना समोर आली आहे. नववीच्या दोन विद्यार्थांनी आपल्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मित्राला जिवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडून मागील 18 महिन्यांत 3 लाख रुपये हडपले.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 09:07 PM IST

नववीच्या विद्यार्थ्यांनी जिवे मारण्याची धमकी देत मित्राकडून हडपले 3 लाख रुपये

मुंबई, 27 जुलै-  नवी मुंबईतील एक शाळेतील धक्कादायक घटना समोर आली आहे. नववीच्या दोन विद्यार्थांनी आपल्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मित्राला जिवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडून मागील 18 महिन्यांत 3 लाख रुपये हडपले. एवढेच नाही तर त्याच्या आई-वडिलांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी पीडित विद्यार्थ्याला धमकावत होते. मुंबईतीस गुंडांच्या ते संपर्कात असून त्यांच्याकडे चाकू व तलवार आहे, असे सांगून ते पीडित मुलाला धमकावत होते. त्यामुळे तो त्यांनी सांगितलेले ऐकत होता. त्यानंतर मात्र आरोपी त्याला जास्त त्रास देऊ लागले. त्या पैशासाठी धमकावू लागले. जिवे मारण्याची धमकी देत आरोपींनी पीडित विद्यार्थ्याकडून आतापर्यंत 3 लाख रुपये हडपले आहे. आरोपींमध्ये एक अल्पवयीन आहे.

धमकीमुळे आजारी पडल विद्यार्थी..

आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिल्याने पीडित विद्यार्थी आजारी पडला. आई-वडिलांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखवले. यादरम्यान आरोपींचा फोन आला. तो पीडित मुलाच्या आईने उचलला. समोरून एक मुलगा बोलत होता. 'काम हो गया क्या?' त्याने असा प्रश्न केला. त्यावर पीडित मुलाची आई म्हणाली, कौन बोल रहा है? समोरून उत्तर आले मैं दोस्त बोल रहा हूं. या फोनवरून आईला संशय आला. तिने आपल्या मुलाला विश्वासात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपबिती पोलिसांनी सांगितली.

पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले की, घरातून काही रुपये गायब झाले होते. आपल्या मुलानेच ते चोरले असून आरोपींना दिले होते. शाखेच्या मुख्याध्यापकांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मंगळवारी (23 जुलै) पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

Loading...

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील ते 17 तास, डब्यात घुसला होता साप पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2019 09:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...