S M L

पुण्यातले दोन रिमांड होम होणार बंद!

उच्च न्यायालयाने दिले आदेश

Updated On: Jul 10, 2018 10:48 AM IST

पुण्यातले दोन रिमांड होम होणार बंद!

पुणे, ता. 09 जुलै : राज्यात बालगुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं असतांना, पुण्यातली दोन बालगृहे बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. चिंतेची बाब म्हणजे, गंभीर गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढलेला असतांना, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे या बालगृहांमधील मुलांची सोय आता कुठे आणि कशी करायची असा प्रश्न एरणीवर आला आहे.गंभीर गुन्ह्यामध्ये अडकलेल्या अल्पवयीन मुलांना रिमांड होम अर्थात बालगृह किंवा निरीक्षण गृहात ठेवण्यात येतं. पुणे जिल्ह्यात अशी केवळ तीन रिमांड होम आहेत. त्यातली दोन येत्या 4 महिन्यात बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत आहेत.

विशेष बाब म्हणजे, हे रिमांड होम बंद करावं यासाठी ते चालवणाऱ्या जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण ट्रस्टनेच न्यायालयात याचिका दाखल केली होती. शिवाजीनगर आणि नाना पेठेतल्या मुलींच्या रिमांड होम मध्ये गैरप्रकार घडकीस आल्यानंतर, त्यावर कारवाई करण्याच्या उद्देशाने महिला बालविकास आयुक्तांनी या संस्थेला नोटीस बजावली होती. मात्र, वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही कारभार सुधारण्यासाठी, अधीक्षकांची नेमणूक करण्यासाठी सरकार पातळीवर कुठलीच दखल घेतली न गेल्याने या संस्थेने बालगृह बंद करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती अशी माहिती सुलभा फलक यांच्याकडून देण्यात आली आहे.

कुठे सुरू झाला 'सॅमसंग'चा जगातला सर्वात मोठा प्रकल्प?

वाढती बालगुन्हेगारी रोखण्यासाठीचे प्रयत्न आधीच तोकडे पडत असताना, सामाजिक काम करणाऱ्या संस्था या कामातून बाहेर पडल्यावर बिघडणाऱ्या परिस्थितीबाबत मात्र अजूनही कुठलीच हालचाल सरकारी पातळीवर दिसत नाहीये.

VIDEO : छगन भुजबळ पुन्हा आक्रमक, विधानसभेत मुनगंटीवारांसोबत जुगलबंदी

Loading...
Loading...

मालाड ते बागपत जेल असा होता मुन्ना बजरंगीचा प्रवास

जिल्हा महिला बालविकास अधिकारी आणि आयुक्तालयाच्या पातळीवर अजून याबाबत आदेश नसल्याचं कारण सांगून पुढे काय करायचं हे निश्चित नसल्याचं सांगण्यात येतंय. एकीकडे बालगुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय हे मान्य करत असतानाच, या मुलांची सोय कुठे आणि कशी करायची असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला असल्याची प्रतिक्रिया महिला बालकल्याण समिती अध्यक्षा अश्विनी कांबळे यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

विकृतीचा कळस, महिलेच्या गुप्तांगात टाकली मिरची

चार वर्षात रिमांड होम मध्ये दाखल झाली 206 मुलं

अनुरक्षण ट्रस्टच्या प्रशासकीय अधिकारी आणि जिल्हा परिविक्षा आश्विनी कांबळे यांनी न्यूज18 लोकमतला दिलेल्या माहितीनूसार पुण्यातील रिमांड होम मध्ये चार वर्षात 206 मुलं दाखल झाली. 2014-15 मध्ये 62 मुलं दाखल झाली, 2015-16 मध्ये 41 मुलं दाखल झाली, 2016-17 मध्ये 70 मुलं दाखल झाली आणि 2017- ते जुलै18 पर्यत 33 मुलं दाखल झाली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2018 09:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close