S M L

नागपुरात 24 तासात दोन जणांची हत्या

. या तिन्ही घटनांमुळे पुन्हा एकदा नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थीतीचा प्रश्न चर्चेला आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2018 07:33 PM IST

नागपुरात 24 तासात दोन जणांची हत्या

नागपूर, 27 आॅगस्ट : राज्याची उपराजधानी नागपूर गेल्या चोवीस तासात पुन्हा एकदा दोन खुनांच्या घटनांनी हादरली आहे. तर या दोन घटना ताज्या असतांनाच गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलोक वडे या व्यक्तीवर राजा लखनसिंग या आरोपीने जीवघेणा हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.

हुडकेश्वर आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत. या तिन्ही घटनांमुळे पुन्हा एकदा नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थीतीचा प्रश्न चर्चेला आला आहे.या तिनही घटना परिसरातील वर्चस्वाच्या वादावरून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विणकर काॅलनीत राहणारा अमित रतन रामटेक आणि म्हाडा काॅलनीत जरीपटक्यात राहणारा अरमान अन्सारी असे दोन मृतांचे नावे असून. अमित हा गुन्हेगारी पार्श्वभुमीचा होता आणि त्याच्यावर तीन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते.

अमितने 2014 मध्ये मित्राचाच खून केला होता नंतर गेल्यावर्षी तलवारीने एकावर त्याने हल्ला केला होता. त्याच्या या नेहमीच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील नागरिक दहशतीत होते.

दरम्यान, चार ते पाच जणांनी अमितवर हल्ला करून त्याची हत्या केली. तर अरमान शेख याचा शेजारी राहणाऱ्या हरीश गुलानी, कार्तिक धार्मिक या दोघांनी कार पार्क कऱण्याच्या वादातून झालेल्या भांडणातून खून केला. तर गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलोक वडे या व्यक्तीवर खूनाच्या प्रयत्नाची घटना घङली आहे.

Loading...
Loading...

गृहकर्ज घेण्याआधी जाणून घ्या या ७ महत्त्वपूर्ण गोष्टी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2018 07:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close