पंकजा मुंडेंची खेळी, विनायक मेटेंना धक्का

पंकजा मुंडेंना धक्का देण्याचा निर्णय आता मेटेंवर उलटणार?

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 12:27 PM IST

पंकजा मुंडेंची खेळी, विनायक मेटेंना धक्का

बीड, 24 मार्च : भाजपसोबत युती करणार नाही असा पवित्रा घेतलेल्या बीडमधील शिवसंग्रामच्या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंकजा मुंडे यांना धक्का देणाऱ्या आमदार विनायक मेटे यांनाच पंकजा मुंडेंनी दणका दिला आहे. मेटेंच्या पक्षातील जिल्हा परिषद सदस्यांनी शिवसंग्रामला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांची महायुतीची बैठक सुरु असताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी विनायक मेटेंना धक्का दिला आहे.

शिवसंग्रामचे विनायक मेटेंनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यांचे कट्टर समर्थक असलेले शिवसंग्रामचे जिल्हा परिषद गटनेते अशोक लोढा आणि जि.प. सदस्य विजयकांत मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. विनायक मेटे यांनी राज्यात भाजपला साथ देऊ पण जिल्ह्यात मात्र पंकजा मुंडेंच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे म्हटले होते.

याआधी मेटेंच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत राजेंद्र मस्के यांनी भाजप प्रवेश केला होता. त्यानंतर आता आणखी दोन नेत्यांनी प्रवेश केल्याने मेटेंना धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेत शिवसंग्रामच्या चार सदस्यांपैकी तीन सदस्य भाजपात गेल्याने मेटेंची अडचण झाली आहे. याआधी मंत्रीपद न दिल्याने शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटेंनी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी पंकजा मुंडेंना मदत करणार नाही असंही जाहीर केलं होतं. मात्र, आता हाच निर्णय मेटेंवर उलटला आहे.

VIDEO: बारामतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर कांचन कुल यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 11:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...